आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ची अंतिम मुदत दिली आहे. आपण 31 डिसेंबरपर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास, आपले पॅन निष्क्रिय होणार आहे. अधिक माहितीसाठी खालील लेख पूर्ण वाचावा.
पॅन कार्ड चा उपयोग
आज पॅन (PAN) म्हणजेच कायमस्वरूपी खाते क्रमांक ( Permanent Account Number) हा बहुतेक लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: याचा उपयोग आयटी रिटर्न भरण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, मोटार वाहन खरेदी करणे, किंवा विक्री करण्यासाठी, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, दागिन्यांची खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून, कर्ज घेण्यासाठी, बँकेच्या व्यवहारासाठी असा बऱ्याच ठिकाणी पॅन कार्ड चा उपयोग होतो तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यात सरकारला मदत होते.
पॅन कार्ड लिंक केले नाहीतर काय होणार?
यामुळेच प्राप्तिकर विभाग लोकांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्याची विनंती सातत्याने करत आहे. यासाठी 31 डिसेंबर 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर आपण आपला पॅन आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर तुमचे पॅन कार्ड डी-ॲक्टिव्हेट केले जाईल. यामुळे व्यवहारात इतर अडचणीही येऊ शकतात.
आधारशी पॅन लिंक करणे का आवश्यक आहे?
आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक फिनटेक कंपन्यांवर ग्राहक प्रोफाइल तयार करण्यासाठी अनधिकृतपणे पॅन तपशील वापरल्याचा आरोप आहे. यामुळेच गृह मंत्रालयाने पॅनद्वारे वैयक्तिक माहितीवर प्रवेश मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखता येईल.
आयकर विभागाने सर्व करदात्यांना आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही मुदतीपूर्वी दोन्ही लिंक केले नाहीत तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी यांसह विविध समस्या उद्भवू शकतात. म्हणून, आपण आपले पॅन आधारशी लिंक नसेल तर लगेच करून घ्यावे,.
लिंकिंग फी किती लागेल?
लिंक करण्यासाठी फीस व शेवटची तारीख?
सरकारने 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी मोफत लिंक करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, आता यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. आधी 500 रुपये होते आता 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ असा की जर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर आपणाला विलंब शुल्क किंवा दंड म्हणून 1,000 रुपये भरावे लागणार आहेत. यासाठी 31 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे
No comments: