Full Width CSS

बालदमा Baldama

 


आज आपण बालदमा या विषयावर सतीश जगे यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असून.बालदमा म्हणजे नक्की काय ,का होतो उपाययोजना काय हे समजून घेणार आहोत चला तर मंडळी सुरुवात करुया विषयाला.

   लहान मुलाची श्वासनलिका लहान असते. कोणतेही काम करताना मुलाला अधून-मधून धाप लागणे, श्वास घेताना छातीतून सुई सुई अशा प्रकारचा आवाज येणे किंवा खोकला येणे म्हणजे  बाल दमा होय.वाढते प्रदूषण, कस नसलेले अन्न आणि आहाराच्या बाबतीतील अज्ञान किंवा दुर्लक्ष यामुळे सध्या लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसते. वारंवार सर्दी-खोकला होत असला, विशेषतः प्रतिजैविक औषधांची गरज भासत असली, तर बाळाला बालदमा तर नाही ना याचे तज्ज्ञांकडून निदान करून घेणे गरजेचे असते. लहान वयात सर्दी, खोकला होणारच अशी समजूत मनात ठेवणे किंवा बाळ मोठे झाले की बालदमा आपोआप आटोक्‍यात येईल अशी धारणा ठेवणे मुलाच्या भावी आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. 

  मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही दमा होऊ शकतो. याला बाळदमा म्हणतात. यासाठी पोट उडणे, डबा, इत्यादी नावेही आहेत. बाळदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी दम लागण्याचा आजार दिसल्यास न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजा.सहा महिन्यांनंतर येणारा दमाही दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो. मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकांत आई, वडील, भाऊ, बहीण,काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ. दम्याचा विकार असल्यास त्या बाळाचा दमा कायमचा विकार होण्याची शक्यता असते. मात्र बाळदमा कोणत्या प्रकारचा आहे हे आधी ठरवणे अवघड आहे.

 अगदी लहान बाळांना सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की त्यातल्या काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धाप लागते. श्वासोच्छ्वास जोरात होऊ लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि काहींचा खोकलाही बराच वाढू लागतो. विशेषतः रात्रीच्यावेळी हा त्रास जास्त होतो. यालाचा दमा लागला आहे, असं म्हणतात. अगदी छोट्या बाळांनाही दमा होऊ शकतो व्हायरल इन्फेक्शन सोडून इतरवेळी ही मुलं बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला बालदमा असं म्हणतात.

काय टाळावे व काय करावे. थंडीत दमा, अस्थमा, बालदमा टाळण्यासाठी.

१)दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

२)दुध,दही, ताक,गोड पदार्थ दम्याचा त्रास तयार करतात तेव्हा हे टाळावेत.

वातावरणातील बदल- घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्या वेळी धूळ उडणार नाही अशा पद्धतीने साफसफाई करा.

३) कुठलाही धूर निर्माण करताना विचार करा. उदबत्ती, कासव छाप यांमुळेही दमा बळावू शकतो.

४) कुठलीही फवारणी पेस्ट कंट्रोल, बेगॉन स्प्रे अगदी सुगंधी परफ्युम्स वापरतानाही विचार करा. शक्यतो दमेकरी माणसाने त्यावेळी तिथून दूर असले पाहिजे.

५) रंगकाम-फर्निचर काम सुरू असताना दमेकऱ्यास दूर ठेवा.

६) अनेकदा आपल्याला बेड माईट्सची अ‍ॅलर्जी असू शकते. याचा संपर्क टाळण्यास गाद्या व उशांना प्लास्टिक कव्हर घाला. आपल्या चादरी व पांघरुणे सुती कपडय़ांचीच वापरा.

७) घरामध्ये कुत्रा, मांजर असेल तर त्याची अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. 

८) सर्वात महत्त्वाचे दम्याच्या आजाराचे निदान होत असेल तर त्याला सामोरे जा.

९) फुप्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा.

१०) डॉक्टरांनी दिलेलेऔषध नियमित वापरा.

११) उपकरण वापरण्याचे तंत्र समजून घ्या. डॉक्टरांना फॉलो अप देताना आपण औषध कसे वापरतो आहोत ते दाखवा.

१२) कुठल्याही परिस्थितीत नियमित वापराचे औषध बंद करू नका. नेहमी परिस्थिती आणीबाणीची असल्यासारखे वागा.

१३) अनेकदा दम्याबरोबर अ‍ॅलर्जीक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टर देऊ शकतात. याचाही वापर नियमित करा.

१४)धूम्रपान आणि दमा म्हणजे आगीत तेल ओतणे आहे हे नक्कीच टाळा.सार्वजनिक जागेवर धूम्रपान करु नका.

१५)संत्री, मोसंबी, केळी,लिंबू ही फळे खाऊ नका.

१६)कोणत्याही प्रकारच्या निकोटीन पासुन दुर रहावे उदा.तंबाखू गुटखा यांनी दम्याचा प्रभाव वाढतो.

१७)वातानुकूलित जागेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

१८) कफवर्धक, डालडा,पामतेल,तळकट वडे,भजी असले पदार्थ खाऊ नयेत.


 बालदमा होण्याची कारणे.

लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या संसर्गामुळे, गुणसूत्रातील दोष म्हणजेच १)आनुवंशिक कारणामुळ २)वातावरणातील घटक म्हणजे विषाणू इनफेक्शन.

३)व्यवसायाशी संबंधित सततच्या प्रादुर्भावामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

 ४) राग-दु:ख, इत्यादी भावना यांमुळे अशा मुलांना दम्याची सुरुवात होऊ शकते.

५)आनुवंशिक नसणारा बाळदमाही  धूळ, परागकण, दमट हवा  किंवा फुप्फुसाच्या विषाणुदाहामुळे होऊ शकतो.

६)दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होणे या मुळे ही श्वसनाला त्रास लागतो व बालदमा होतो.

७)गर्भधारणा होण्यापूर्वी आई-वडिलांपैकी एकाला वा दोघांना खोकला वा दम्याचा त्रास असणे किंवा त्यांच्यात कफ-वातदोषाचे असंतुलन असणे.

८)गर्भवती स्त्रीने गर्भारपणात कफ-वात वाढेल असा आहार-आचरण करणे.

९)लहान मुले अतिशय संवेदनशील असतात. डोक्‍या-कानाला वारा लागू नये यासाठी मुलांना टोपडे घालण्याची पद्धत असते. अंघोळीनंतर डोके तसेच अंग ओलसर राहू नये यासाठी धुरी द्यायची प्रथा असते. या प्रकारची काळजी वेळेवर घेतली नाही तर त्यामुळेही वात - कफदोषामध्ये बिघाड होऊन बालदम्याची सुरुवात होऊ शकते.

१०)सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहणे, पंखा, कूलर वगैरेंचा थंड हवेचा झोत सरळ अंगावर घेणे.

११)लहान वयात कफ वाढण्याची प्रवृत्ती असतेच. त्यात केळे, सिताफळ, फणस, श्रीखंड, दही, बर्फी चॉकलेट, चीज, पनीर, क्रीम वगैरेंच्या अतिसेवनाची भर पडल्यामुळे कफ अधीकच वाढतो आणि बालदम्याचे बीज रोवले जाऊ शकते.

११)थंड पदार्थामुळेही कफ वाढू शकतो. केक, कोल्ड्रिंक्‍स, आईस्क्रीमसारख्या थंड गोष्टी सातत्याने, कोणत्याही ऋतूत सेवन करण्याची सवयही दम्यास कारणीभूत ठरू शकते. १२)अन्नवहस्रोतसातील बिघाडही बालदम्याचे कारण ठरू शकते. विशेषतः पोटात जंत असणे, मलावष्टंभाची प्रवृत्ती असणे या दोन कारणांमुळे हळूहळू दम्याची लक्षणे उद्भवू शकतात. 

१३)प्राणवह स्रोतसाची ताकद कमी असल्यानेही दम्याला आमंत्रण मिळू शकते. वारंवार सर्दी-खोकला होणे, नाक बंद पडल्याने श्‍वास नीट न घेता येणे वगैरे लक्षणे श्‍वसनसंस्था कमकुवत असल्याची निदर्शक असतातच. त्यातून, यावर जर केवळ रोग दबविणारे उपचार केले गेले तर असंतुलन वाढून त्याचे पर्यवसान दम्यात होऊ शकते. 

१३दमट हवामानात, ओल आलेल्या घरात राहणेसुद्धा दम्याला पोषक ठरू शकते.

लक्षणं.

काश्‍यपसंहितेत लहान मुलांच्या रोगांसंबंधी वर्णन करताना वेदनाध्याय सांगितला आहे. यात बोलू न शकणाऱ्या लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरून वैद्याने रोगाचे निदान कसे करावे हे समजावलेले आहे. अगदी लहान मुले बोलू शकत नाहीत, तसेच बऱ्याच मुलांना आपल्याला नेमके काय होते आहे, हे सांगता येत नाही. अशा वेळी मुलांच्या हावभावांवरून, लक्षणांवरून वैद्यांना रोगाचे निदान करता यावे यासाठी या अध्यायात अनेक रोगांची माहिती दिलेली आहे. त्यात दम्याचाही अंतर्भाव केलेला आहे.


निष्टनत्युरसा।त्य़ुष्णं श्‍वासस्तस्योपजायते।

... काश्‍यपसंहिता सूत्रस्थान

बालकाच्या छातीतून गरम श्‍वास निघतो, त्याला श्‍वास घ्यायला व सोडायला त्रास होतो, असे बालदम्याचे लक्षण. काश्‍यपसंहितेत सांगितलेले आहे. आयुर्वेदीय विचारसरणीनुसार दमा होतो म्हणजे नेमके काय होते हे खालील सूत्रावरून समजू शकेल,

कफोपरुद्धगमनः पवनो विष्वगास्थितः।

प्राणोदकान्नवाहीनिदुष्टः स्रोतांसि दूषयन्‌ ।।

... अष्टांगसंग्रह शारीरस्थान

यावरून आपल्याला कसा होतो लक्षण काय दिसतात हे कळले असेलच. आयुर्वेदात बालदम्याची अथवा दम्याची लक्षण विषद करतांना हा त्रास नेमका कसा होतो हे समजवतांना श्वसनसंस्था चे कार्य थोडक्यात विषद केले आहे व वात व कफ प्रकोपीत झाल्यास हा त्रास कसा उद्भवतो हे समजावले आहे.

  आयुर्वेदात म्हंटल्या प्रमाणे प्राण-उदानाची जोडी श्‍वासोच्छ्वासाचे काम करत असते. उरलेल्या तीन वायूंचा म्हणजे समान, व्यान व अपान यांचाही प्रभाव श्‍वासोच्छ्वासावर होत असतोच. वाताची गती जोवर व्यवस्थित आहे तोवर श्‍वसन व्यवस्थित चालू असते पण ती गती कफदोषामुळे अवरुद्ध झाली तर अडलेला वात प्राणवह, उदकवह तसेच अन्नवह स्रोतसांना बिघडवतो व दम्याची उत्पत्ती करतो. थोडक्‍यात दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात. लहान वयात कफाचे आधिक्‍य स्वाभाविक असते, त्याला वाताची जोड मिळाली तर त्यातून "बालदमा' होऊ शकतो.यामुळे 

पुढील लक्षणं दिसतात.


१)श्वास सोडताना,घेताना शिट्टीसारखा आवाज येतो.

२)आतल्या आवरणाला सूज येणे आणि चिकट पाझराने बेडका तयार होणे या तीन प्रमुख प्रक्रियांमुळे हवेचा मार्ग अरुंद होतो. यामुळे श्वसनास जास्त श्रम लागतात. यामुळे धाप लागणे, श्वास वेगाने चालणे, खोकला, इत्यादी लक्षणे दिसतात.

३)बालकाला सर्दी, शिंका अशा त्रासाने सुरुवात होते.

४)श्वसन उथळ आणि जलद होते.

५)नाकपुड्या फुलतात.

६)मूल मोठे असेल तर छाती दाटल्याचे सांगते.

७)खोकल्याची मधून मधून उबळ येते.

 ८)मुलाला संडास न होण्याच्या तक्रारी वाढतात.

९)संडास ला खडे व्हायला लागतात.

१०)छाती वाजायला लागून काहींन मध्ये लोहाराच्या भात्या प्रमाणे आवाज येतो.

११)घाटीत काही अडकल्या सारखे वाटते.

१२)जास्त त्रासात नाकातून पिवळट चिकटा,टाँयलेट मधून शेंबडट आव ही दिसते.

१३)नाकाने श्वास घेतांना अडचण येते.तोंडानं श्वसन करतात.

१४)मुलांची इम्युनिटी पाँवर कमी होते.मुल कृष भासते.

१५)कधी कधी जोरदार अँटँक आल्यागत डोळे फिरवते निपचित पडते.

१३)ओठ व चेहरा हिरवा निळा अती त्रासात भासतो.

१४)पोटफुगी, पोटाचा डबा दिसतो.

    पण त्रास कमी असल्यास छान खेळताना दिसते म्हणून अनेक पालक लक्षणं दिसूनही दुर्लक्ष करतात व रोग बळावतो.

कोणाला होतो बालदमा.

दोन किंवा अडीच वर्षांच्या बाळांनाही बालदम्याचा त्रास बघायला मिळतो. याहून कमी वयाच्या बाळांमधल्या दम्याचे निदान करणे अवघड असते.वयाच्या १२ ते १४ वर्षांपर्यंत बालदमा राहू शकतो.

उपाययोजना.

१)ज्या मुलांना वाफारा घेणे जमते, त्यांना गरम पाण्यात आले, तुळशीची पाने, ओवा, निलगिरीची पाने किंवा तेल वगैरे टाकून वाफारा द्यावा.

२)छातीला व पाठीला नियमितपणे तीळ तेल लावून शेक करण्याचा उपयोग होतो. 

३)चार कप पाण्यात ज्येष्ठमधाची बोटभर लांबीची कांडी, एक बेहडा व अडुळशाचे एक पिकलेले पान घालून मंद आचेवर एक कप उरेपर्यंत उकळू द्यावे. तयार झालेला काढा गाळून घेऊन साखरेसह द्यावा. 

४)वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण दिल्यास उलटी होते.व कफाचा आवेग कमी होऊन. कफ सरतो व बाळाला बरं वाटतं.

५)गरम उकळत्या पाण्यात कोबी किसून वाफारा घेतल्यास कफाचा आवेग कमी होऊन त्रास कमी होतो.

६)कपभर दूधात चार लसूण पाकळ्या उकळून ते दूध अर्धा कप राहील्यावर किंचित हळद घालून पाजा.

७)कोबीचा रस दोन चमचे देत जा.

८)कपभर पाण्यात एक इंच आले किसून टाका व दोन लसूण पाकळ्या व पाच दहा तुळशीची पानं टाकून उकळा व अर्धा कप राहील्या वर पाजा दोन तीन वेळात वरती चमचाभर मध द्या.

९)चमचाभर ओवा, चार लवंगा,  दोन कप पाण्यात उकळून वाप द्या नंतर ते अर्धा कप पर्यंत आटवून मधात मिक्स करून थोडे थोडे पाजा.

१०)आले,लसूण, सुंठ, मीरी,ओवा  दोन कप पाण्यात उकळून वाफ द्या. थंड झाल्यावर मधा सोबत हे मिश्रण देत गेल्यास कफ झडून जातो.

११)मेथी दोन चमचे दोन कप पाण्यात उकळून ते पाणी थोडे थोडे देत जा.

 १२)सांबर शिंगाचा तुकडा पाण्यात सहाणीवर उगाळून ते चमचाभर गंध पोटात घ्यावे.

१३)दम लागलेला असतांना ॐ नमः शिवाय । हा जप केल्याने दम्याचा त्रास न्यून होतो.(सनातन प्रभातचे निरिक्षण)

१२)कोरफडीचा रस पाव चमचा मधातून देणे.

१३)रात्री सहा वर्षाच्या आतील मुलांना चमचाभर आवळा चुर्ण गरमपाण्यात चमचाभर एरंडेल तेला सह देत जाणे व  सहा वर्षावरील मुलांना त्रिफळाचुर्ण नियमित एरंडेला सह देणे उत्तम पर्याय आहे. 


** आदरणीय सुनिता सहस्त्रबुद्धे मँडमने दिलेले काही उपाय ही शेअर करतोय.


बाळदमा- दमा-  अस्थमा..

 या सर्वांवर उपचार..

१) दालचिनि, लवंग, मिरे, सुंठ, जायपत्रि, व खडिसाखर समभाग एकत्र करावे. हे अर्धा चमचा मिश्रण मधासह सकाळ, संध्याकाळ घ्यावे.

२) अडुळश्याचि पाने वाफवून रस काढावा. व दोन चमचे रसात मिसळून चिमूटभर दालचिनिचे चूर्ण टाकून मधासह दिवसातून तिन वेळा घेणे.

३) दम्याचा तीव्र वेग असता आल्याचा रस श मध हे मिश्रण वारंवार चाटवावे.

४)  दम्याचा रोग तीव्र  असता लवंव वेलचि पूड घालून विड्याची पाने चघळून खावे व हळुहळु, रस  गिळत राहावा.

५)  दम्याचा  तीव्र वेग असता कोमट तीळ तेलात थोडेसे मीठ घालून छाति व पोटावर हलक्या हाताने चोळावे. संतुलन अभ्यंग तेलाचाहि उपयोग होतो. उकळत्या पाण्यात लवंग, तूळशि, ओवा, अक्कलकारा, कापूर यापैकि मिळतिल तेवढ्या गोष्टि टाकुन वाफारा घ्यावा. किंवा निलगिरि वा लवंगाच्या तेलाचा वाफारा घ्यावा.

६) दम लागत असतांना रूईच्या पानास तेलाचे बोट लावून तव्यावर गरम करावे. व त्याने छाति व पोटाला तेल लावून शेकावे.

७) कपभर पाण्यात थोडे किसलेले आले उकळावे. व गाळल्यावर खडिसाखर, चिमूटभर कापूर, व थोडा हिंग घालून गरम असतांना घोट- घोट प्यावे. याने दम लागायचा कमि होतो.

८)  दमा असतांना गवति चहा, तुळशिचि पाने, दालचिनि टाकुन केलेला चहा नियमित प्यावा.

९) दम्याचा त्रास असता वर्षभर विशेष त्रास होतो. त्या ऋतूत सकाळि एक कप पाण्यात एक चमचा मध घालून घ्यावा. ( पाणि गरम नसावे) 

१०) जेवणात फोडणित लसणाचा वापर दम्यासाठि उपयुक्त ठरेल.

११)  दम्याचा आवेग कमि करण्यासाठी ८-१० थेंब दालचीनिचे तेल साखरेत मिसळून खावे.

१२)  आल्याचा रस, विड्याच्या पानाचा रस, व मध समप्रमाणात एकत्र करून घ्यावा.

    वरील पैकि तुम्हि कोणताहि उपचार करू शकता...

    ।। निरामय आयुर्वेद।।

बालदमा Baldama बालदमा Baldama Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 28, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.