नमस्कार मित्रानो, आमच्या आजच्या या नावीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नावीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण नावी (Navi) अँप काय आहे, नावी अँप वरून लोनसाठी कसे अप्लाय करायचे, नावी अँप वरून लोन घेतले तर फायदे, तोटे काय आहेत. याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.मित्रांनो, प्रत्येक माणसाला कधी न कधी तरी पैश्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागते. मग अश्या वेळी आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रां कडे पैसे उधार मागतो. पण आजकाल कोणाकडे पैसे मागितले तर लोक काहीतरी कारण सांगून नाही म्हणतात. मग अश्या वेळेस आपण निराश होतो आणि काय करावे ते सुचत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला जर कधी पैश्यांची गरज पडली तर कोणाकडे मागायची गरज नाही, कारण आता तुम्ही नावी अँप द्वारे पर्सनल लोन किंवा होम लोन मिळवू शकता. आणि हे लोन चे पैसे ही तुम्ही लगेच तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, पैश्यांची गरज असणाऱ्या व लोन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा लेख खूप महत्व पूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात पहिले नावी लोन अँप (Navi Loan App) म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या…
मित्रांनो, नावी लोन अँप हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत तुम्ही घरबसल्या होम लोन किंवा पर्सनल लोन घेऊ शकता. आणि या अँपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेल्या लोन ची अमाउंट तुमच्या बँक खात्यात लगेच जमा होते. याचे मूळ नाव नावी फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड असे असून ही कंपनी NBFC द्वारे नोंदणीकृत आहे. तसेच याला RBI ची सुद्धा मान्यता मिळाली आहे. नावी लोन अँप द्वारे तुम्ही 5 लाख पर्यंत पर्सनल लोन आणि 1.5 कोटी पर्यंत होम लोन घेऊ शकता.
नावी पर्सनल लोन अँप ची वैशिष्ट्ये:-
- मित्रांनो, या अँप द्वारे तुम्हाला रू 20 लाख पर्यंत लोन मिळू शकते.
- या लोनचा इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर हा 9.9% पासून सुरू होते ते 45% प्रतिवर्षी इतका असू शकतो. (मित्रांनो, अंतिम व्याजदर हे अर्जदाराचे वय, त्याचे मासिक उत्पन्न, त्याचा जॉब प्रोफाइल, त्याचा क्रेडिट स्कोअर, कर्ज परतफेड करण्याचे रेकॉर्ड इत्यादी गोष्टीं वर अवलंबून असते)
- तसेच कर्जाचा कालावधी हा 3 ते 72 महिने म्हणजे 6 वर्षांपर्यंत असतो.
- नावी लोन ची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने होते.
- तसेच लोनची अमाउंट त्वरित तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
मित्रांनो, नावी पर्सनल लोन कसे कार्य करते ते आपण एका उदाहरणा द्वारे समजून घेऊ या…
मित्रांनो, समजा तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम ही रू 50,000 आहे. आणि या कर्जाचा कालावधी 12 महिन्याचा आहे.
- या कर्जावरचा व्याज दर – 22% इतका आहे. आणि तुमचा EMI – रू 4,680 इतका बसेल.
- एकूण देय व्याज – रू 4,680 x 12 महिने – रू 50,000 (मुद्दल) = रू 6,160
- प्रोसेसिंग फी म्हणजे प्रक्रिया शुल्क (जीएसटीसह) – रू 1,475 इतकी आकारली जाईल.
- तुम्हाला बँकेत वितरित होणारी एकूण रक्कम – रू 50,000 – रू 1,475 = रू 48, 525
- आता इथे तुमची एकूण देय रक्कम – रू 4,680 x 12 महिने = रू 56,160 इतकी होईल.
- कर्जाची एकूण किंमत = व्याजाची रक्कम + प्रक्रिया शुल्क = रू 6,160 + रू 1,475 = रू 7,635
नावी होम लोनची वैशिष्ट्ये:-
- मित्रांनो, नावीन अँपद्वारे तुम्ही 5 कोटी पर्यंत होम लोन म्हणजेच गृह कर्ज मिळवू शकता.
- घेतलेल्या कर्जावर 8.75% प्रतिवर्ष पासून व्याजदर आकारला जातो.
- तसेच कर्जाचा कालावधी हा 30 वर्षे पर्यंत असू शकतो.
- या कर्जासाठी प्रोसेसिंग फी ही शून्य आहे. तसेच या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आहे.
No comments: