Full Width CSS

बारावी नंतर काय करावे…?

 



नमस्कार मित्रांनो, बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे Career after HSC 12th  बारावी नंतर काय करावे…? आणि त्यांचे करिअर बाबत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक पण चिंतेत असतात. कोणत्या कॉलेज मध्ये प्रवेश करावा..? कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा…? हाच प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकाला पडलेला असतो.

बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक कोर्स असतात. त्यामध्ये डिप्लोमा कोर्स, प्रोफेशनल कोर्स, कॉम्प्युटर कोर्स, इत्यादी कोर्स उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात.आपण या मध्ये बारावी मधील तीन शाखेमधील ( सायन्स, कॉमर्स, आर्ट ) पुढील असलेले कोर्स, शाखा आणि डिप्लोमा या विषयी माहिती पाहणार आहोत.

बारावी नंतर काय करावे…?

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सायन्स ( Science ) PCM ( Physics Chemistry Mathematics ) मधील विद्यार्थी B.Tech, B.Sc, इत्यादी कोर्स करू शकतात. आणि PCB ( Physics Chemistry Biology ) मधील विद्यार्थी MBBS, BDS, इत्यादी कोर्स करू शकतात.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कॉमर्स मधील विद्यार्थी B.Com, CA, इत्यादी कोर्स करू शकतात.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्ट्स ( Arts ) मधील विद्यार्थी BA, BJMS, इत्यादी कोर्स करू शकतात.

 

बारावी सायन्स नंतर काय करावे

( Science Student )

 

बारावी नंतर सायन्स चे दोन विषयात भाग पडतात.

PCM (Physics Chemistry Mathematics)

PCB ( Physics Chemistry Biology )

 

PCM विषयातील विद्यार्थ्यांसाठी कोर्स

बरेच PCM विषयातील विद्यार्थी हे इंजीनियरिंग करण्यासाठी जातात. आणि ज्यांना प्राध्यापक किंवा रिसर्च सेंटर वर जायचे आहे ते BSC करतात. आणि त्यासोबत PCM च्या विद्यार्थ्याना कॉमर्स आणि आर्ट या विषयात पण प्रवेश मिळू शकतो.

बारावी PCM नंतर हे मुख्य कोर्स आहेत. 

  • B.Tech ( बॅचलर इन टेक्नॉलॉजी )
  • B.Sc ( बॅचलर ऑफ सायन्स )
  • NDA ( एनडीए )
  • B.Arch ( बॅचलर ऑफ आर्किटेक्चर )
  • BCA ( बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन )

विद्यार्थी इत्यादी विषयात प्रवेश घेऊ शकतात.PCB विषयातील विद्यार्थ्यांसाठी कोर्स

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनायचे आहे तेच विद्यार्थी बारावी मध्ये PCB ( Physics Chemistry Biology ) हे विषय घेतात.

डॉक्टर बनण्यासाठी विद्यार्थ्याना MBBS, BDS इत्यादी कोर्स करावे लागतात.

बारावी PCB नंतर हे मुख्य कोर्स आहेत.

 

  • MBBS ( बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी )
  • BDS ( बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी )
  • BUMS ( बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी )
  • B.Sc ( बॅचलर ऑफ सायन्स )
  • BHMS ( बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरी )

इत्यादी विषयात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

बारावी कॉमर्स नंतर काय करावे

 ( 12 th Commerce Student )

 

बारावी कॉमर्स नंतर विद्यार्थी फायनान्स बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतात. बहुतेक विद्यार्थी बारावी कॉमर्स नंतर B.Com मध्ये प्रवेश करतात.

काही विद्यार्थ्यांना बारावी कॉमर्स नंतर दुसऱ्या कोर्स विषयी माहिती नसते म्हणून ते B.Com मध्ये प्रवेश करतात.

B.Com हा एक चांगला कोर्स आहे.

परंतु या व्यतिरिक्त करण्यासाठी अनेक दुसरे कोर्स आहेत.

ते खालील प्रमाणे :

 

12 th Commerce ke baad best course

 

बारावी कॉमर्स नंतर हे कोर्स मुख्य आहेत.

 

  • B.Com ( बी.कॉम )
  • BBS ( बॅचलर इन बिझनेस स्टडीज )
  • BMS ( बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज )
  • BBA ( बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन )
  • B.Com LLB ( बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ )
  • CA ( चार्टर्ड अकाउंटन्सी )
  • CS ( कंपनी सेक्रेटरी )

 

B.Com LLB या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला CLAT ची परीक्षा द्यावी लागते.

 

बारावी आर्ट्स नंतर काय करावे…?

( 12 th Arts Student )

 

बारावी आर्ट्स मधील विद्यार्थी खालील कोर्स मध्ये प्रवेश करू शकतात.

  • BA ( बॅचलर ऑफ आर्ट्स )
  • BA LLB ( बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ )
  • B.El.Ed ( प्राथमिक शिक्षण पदवी )
  • BSW ( बॅचलर ऑफ सोशल वर्क )
  • BFA ( बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स )
  • BHM ( बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )

 

पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. 🙏🙏

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

बारावी नंतर काय करावे…? बारावी नंतर काय करावे…? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.