सरकारी योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार महिना 1500 रु. चे अर्थसहाय्य
June 30, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार महिना 1500 रु. चे अर्थसहाय्य
राज्य सरकारनी अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना राज्य सरकारनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार आहे.
योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
कोणी सुरवात केली महाराष्ट्र शासन
घोषणा कधी झाली 27 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात
उदेश्य महिलांना स्वावलंबी बनवणे
लाभ महीना 1500 रुपये
लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबातील सर्व महिला
वयोमर्यादा 21 ते 60 वर्षापर्यंत
अर्ज कधी सुरू होणार 1 जुलै पासून
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट लवकरच सुरू होणार आहे
डाउनलोड GR Download
⬛️ काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व महिलांना स्वालंबी बनविण्यासाठी शासनातर्फे दरमहा 1500 रुपये तर वर्षाला 18000 रुपये (बँक खात्यावर जमा) दिले जाणार आहेत.1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती राज्यसरकडून देण्यात आली आहे
⬛️ कोणत्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे :
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
⬛️ या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे ?
रेशनकार्ड
लाभार्थ्याचे आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक (पहिल्या पानाची झेरॉक्स)
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला / रहिवासी
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य)
सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
⬛️ कोणत्या महिलांना लाभ घेता येणार नाही ?
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. (Tax Payer)
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
⬛️ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे
योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अँपद्वारे / सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी /ग्रामीण / आदिवासी )/ ग्रामपंचायत / वार्ड / सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी / ग्रामीण / आदिवासी) / सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
⬛️ या तारखेपासून अर्ज करता येईल?
अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल. 1 जुलै 2024
अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 5 जुलै 2024
तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024
अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024
लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे 10 ऑगस्ट 2024
लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024
त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार महिना 1500 रु. चे अर्थसहाय्य
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 30, 2024
Rating:
No comments: