Full Width CSS

पाईपलाईन अनुदान योजना सुरू, असा करा अर्ज ?

  राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. आज आपण या लेखांमध्ये पाईपलाईन अनुदान योजनेबद्दल (PVC Pipe Subsidy In Maharashtra). माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

जर तुम्हाला नवीन पाईपलाईन करायाची असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण राज्या सरकार कृषी सिंचन योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन करण्यासाठी आता अनुदान देणार आहे. तुमच्या शेतामध्ये जल सिंचन स्रोत उपलब्ध नसेल किंवा शेताजवळ तलाव किंवा नदी आहे. तर तुम्ही तिथून तुमच्या शेतापर्यंत पाईपलाईन करण्यासाठी सबसिडी (pipeline subsidy) देत आहे.

पाईपलाईन खरेदीसाठी अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यानं पाईपलाईन खरेदीसाठी महाराष्ट्र शासन 50% किंवा पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान दिला जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला पीव्हीसी पाईप खरेदी करिता करण्यासाठी अनुदान दिल जातात.

Pipeline Anudan Yojana

पाईपलाईन खरेदी साठी अर्ज कसा करावा ?


नवीन पाईपलाईन खरेदी करायची असेल तर तुम्ही या साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम “Maha-Dbt” या पोर्टल वर जाऊन अर्ज लॉग इन करून स्वतःचे संपूर्ण प्रोफाइल तयार करावे.

त्यानंतर कृषी सिंचन योजना अंतर्गत पाईपलाईन खरेदीसाठी अर्थ सहाय्य हे ऑप्शन निवड त्यानंतर त्यामध्ये पाईप लाईन चा प्रकार, पाईपलाईन ची लांबी किती पाहिजे ते टाकावे आणि अर्ज सादर करा. किंवा तुमच्या जवळील महा-ई -सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या व तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड.
  • ई-मेल आयडी.
  • बँक पासबुक.
  • 7/12 उतारा.
  • 8/अ उतारा.
पाईपलाईन अनुदान योजना सुरू, असा करा अर्ज ? पाईपलाईन अनुदान योजना सुरू, असा करा अर्ज ? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.