Full Width CSS

लहुजी राघोजी साळवे



 



क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या "नारायण पेठ" मध्ये पूर्वीच्या मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे.त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले.



दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.{संदर्भ हवा}

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे

इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे. उपमा -धर्मवीर लहुजी वस्ताद, आद्यक्रांती लहुजी वस्ताद

लहुजी राघोजी साळवे  लहुजी राघोजी साळवे Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 16, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.