महाशिवरात्रि हे व्रत सर्वात महत्वाच्या व्रताच्या यादीत येते. तर हा महाशिवरात्रि व्रत कसा करावा आणि का करावा, या व्रताचे फळ काय, पूजा काशी करावी तसेच महाशिवरात्रि व्रत कथा सुध्दा आपल्याला इथे वाचायला मिळणार आहे.सूतजी म्हणतात : ‘“सोमवारच्या अष्टमीला आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला कोणी उपवास केला तर त्याच्यावर श्री महादेव विशेष प्रसन्न राहतात. आणि महाशिवरात्री ( mahashivratri 2023 ) सर्वांत बलवान व्रत आहे.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी , माघ कृष्ण १३ रोजी महाशिवरात्रि आहे....
कोट्यवधी हत्यांचे पाप ज्याच्या डोक्यावर आहे त्यानेही जर विधिवत् महाशिवरात्रीचे ( mahashivratri 2023) पूजन-अर्चन केले, भलेही मंदिरात गेला नाही - आपल्या घरीच अर्चन किंवा मानसिक पूजन केले तर त्याचे रोग-शोक, पाप-ताप श्रीमहादेवांच्या कृपेने नष्ट होतात आणि त्याचे हृदय प्रफुल्लित व पुण्यमय होते."
अष्टमी व चतुर्दशीचा उपवास ग्र हिशोबाने आपल्या आरोग्यास भक्तिभावासाठीही चांगला आहे.अष्टमी व चतुर्दशीचा उपवास ग्रह-नक्षत्राच्या हिशोबाने आपल्या आरोग्यासाठी आणि भक्तिभावासाठीही चांगला आहे. श्री महादेव म्हणतात की 'जो सांगोपांग (विधी-विधानासह), संयमाने, ब्रह्मचर्य व्रत पाळून, असत्य व कपटाचा त्याग करून महाशिवरात्रीचे व्रत करतो त्याला वर्षभराच्या शिवपूजेचे फळ मिळते.
काय आहे महाशिवरात्रि व्रताचे फळ 2023
श्री सूतजी शौनक ऋषींना म्हणतात: "ज्यांना आत्मज्ञानाच्या सत्संगाचे श्रवण-मनन करायला मिळत नाही त्यांनी विधिपूर्वक श्रद्धा भक्तीने शिवपूजन, शिव-व्रत केले पाहिजे.श्रद्धा-भक्तीने केलेले महादेवांचे पूजन-स्मरण कालांतराने त्यांना आत्मशिवाची विद्या देणाऱ्या सत्संगात पोहोचविते आणि सत्यस्वरूप व्यापक शिवाचा साक्षात्कार करवून देते. ' "
मला जर फळली तर एक महाशिवरात्री फळली. जेथे कोणीच नव्हते तेथे मी एकट्यानेच जमेल तशी पूजा केली आणि माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाले. मी विचार करीत होतो की 'घर सोडून जातो, काय होईल, कसे होईल ?... ते सर्व निघून गेले, उडी घेण्याची हिंमत आली. बाबा ! महाशिवरात्री व्रताने कैलासपती शिवशंकर येतात की नाही ही गोष्ट सूक्ष्म आहे परंतु तुमचे हृदय तर शिवमय होते, भाव तर शुद्ध होतो.
महाशिवरात्र पूजा विधी - घरालाच बनवा शिवालय
महाशिवरात्रि उपवास कसा करावा - तुम्ही आपल्या घरात साधन-भजनाची, पूजेची एक अशी खोली बनवा की जेथे संसाराची 'खटपट' नसेल. मग तेथे शिवलिंगाची स्थापना केली तर ठीकच आहे, नाहीतर भगवंत ज्यांच्या हृदयात नृत्य करीत आहे, वाणी उच्चारण करीत आहे अशा एखादया ब्रह्मवेत्तामहापुरुषाचे श्रीचित्र लावा की ज्यांच्यात तुमची श्रद्धा असेल. रोज थोडेफार ध्यान, जप करा. कधीकधी तेथे फुले ठेवा, दिवा लावा, धूप वगैरे करा.धूप रसायन (chemical) युक्त कृत्रिम सुगंधाच्या अगरबत्त्यांचा नाही; या तर गडबड करतात. देशी गायीच्या जळत्या गोवरीवर थोडे गुग्गुळ टाका अथवा निखाऱ्यांवर थोडी हवन-सामग्री टाका अथवा तर 'गौ-चंदन धूपबत्ती' जाळा. तेथे तुम्ही नियमाने मंत्रजप, साधन-भजन कराल तर ती जागा थोड्याच दिवसांत शिवमंदिर झालेली तुम्हाला दिसून येईल.मग जेव्हा संसाराची विडंबना, संकट येईल तेव्हा तुम्ही हात-पाय धुऊन त्या पूजेच्या खोलीत जाऊन थोडी प्रार्थना करा. ५-७ मिनिटे ॐकारचे दीर्घ उच्चारण करून मानसिक जप व ध्यान करा. जर रात्रीची वेळ असेल तर ध्यान करता-करता ध्यानाचा जो भाव बनला आहे त्याच भावात शयन करा. रात्री स्वप्नात तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, नाहीतर पहाटे नक्कीच मिळेल. पहिल्या दिवशी नाही मिळाले तर दुसऱ्या दिवशी मिळेल. उत्तर मिळेल अथवा तर समस्येचे आपोआपच समाधान (निवारण) होईल, ही अगदी खरी आणि पक्की गोष्ट आहे !
महादेवांना हेच मागा की 'हे भोळ्या शंकरा ! अशी कृपा कर की शिवस्वरूपाचा अनुभव करवून देणारा सत्संग आम्हाला मिळत राहो, आम्हाला शिवतत्त्वात जागृत झालेल्या संतांचे सान्निध्य मिळो.'
जाणून घ्या महाशिवरात्रि उपवास कसा करावा आणि का?
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 15, 2023
Rating:
No comments: