अंगदुखी.
शुद्ध केलेला गुग्गुळ, तूप व मध यांचे मिश्रण घेतल्यास शरीरातील वातदोष कमी होऊन अंग दुखणे बरे होते.
पारिजातकाची पाने अंगदुखी कमी करणारी असतात. ताजी पाने वाटून काढलेल्या एक चमचा रसात चमचाभर आल्याचा रस व खडीसाखर मिसळून घेण्याने अंग दुखणे कमी होते.
पारंपरिक पद्धतीने बनविलेले मेथ्यांचे लाडू वातशमन करून अंगदुखी कमी करणारे असतात. म्हणून आपल्याकडे बाळंतिणीला मेथ्यांचे लाडू खायला देण्याची पद्धत असते.
सब्जा म्हणून तुळशीसारखी एक वनस्पती असते. तिच्या पानांचा रस काढून अंगावर चोळल्यास अंग दुखणे कमी होते.
हाडांमध्ये दुखत असले किंवा फ्रॅक्चर झाल्यामुळे हाड दुखत असेल तर बाभळीच्या बियांचे चूर्ण मधाबरोबर घेण्याने बरे वाटते.
*झोप न आल्यामुळे अंग दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण पाण्याबरोबर घेता येते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते तसेच अंग दुखणे, अंगात चमका येणे, उठणे-बसणे अवघड होणे वगैरे तक्रारी कमी होतात.
*सर्दी-तापामुळे अंग दुखत असले तर गवती चहाचा संपूर्ण अंगाला वाफारा घेण्याने घाम येतो व ताप उतरतो, पर्यायाने अंगदुखी कमी होते असे दिसते.
No comments: