
ITR Form देशातील लाखो करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयटीआर फॉर्मशी संबंधित अधिसूचना काढली असून आता तुम्हाला लवकरच प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तयार सुरु करायची आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी नवीन आयकर रिटर्न फॉर्म जारी करण्यात आले आहेत. (CBDT) ने मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी नवीन प्राप्तिकर रिटर्न फॉर्मसह आयकर परताव्याची पोचपावती देखील अधिसूचित केली आहे. CBDT नेहमी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयकर रिटर्न फॉर्म अधिसूचित करते पण यावेळी आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अधिसूचित करण्यात आले आहेत.आयटीआर फॉर्मचे प्रकार
कर विभागाने ITR फॉर्म १ ते ६, आयटीआर-व्ही (सत्यापन फॉर्म) आणि ITR पावती फॉर्मची अधिसूचना काढली आहे. मात्र, यंदा केंद्रीय बोर्ड नवीन वर्षापासून आयकर रिटर्न भरण्यासाठी सामान्य आयकर विवरणपत्र (कॉमन आयटीआर) जारी करेल, असे अपेक्षित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर करताना सर्व करदात्यांसाठी कॉमन आयकर रिटर्न फॉर्म देखील प्रस्तावित केला होता. अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की त्यांना यात आणखी सुधारणा पहायच्या आहेत त्यामुळे करदात्यांच्या सोयीसाठी, नेक्स्ट जनरेशन कॉमन इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म आणला जाईल. मात्र, येत्या मूल्यांकन वर्षापासून तसे होताना दिसत नाही
x
ITR Form: प्राप्तिकर रिटर्न भरण्याची लगबग करा; ITR फॉर्म जारी, जाणून घ्या अंतिम तारीख
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 27, 2023
Rating:

No comments: