Full Width CSS

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज?

 


प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज?


पीएम मुद्रा योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे एक खास वैशिष्ट्ये असे आहे की, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या चार लोकांमध्ये तीन महिला लाभार्थी आहेत. केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना आपला उद्योग (व्यवसाय) सुरु करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू करण्यात आली.
धानमंत्री मुद्रा योजनेचा (पीएमएमवाय) उद्देश्य?

sbi mudra loan


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) दोन उद्देश्य आहे. पहिले स्वंयरोजगारसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता
सरकारचा असा विचार आहे की, सहज कर्ज मिळाल्याने लोक स्वंयरोजगार करण्यासाठी प्रेरित होतील. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरु होण्यापूर्वी छोट्या उद्योगासाठी बँकेतून लोन घेण्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. कर्जसाठी गॅरंटीही द्यावी लागत होती. या कारणामुळे अनेक लोक आपला स्वत:चा व्यवसाय तर सुरु करण्यास इच्छुक होते मात्र बँकेतून कर्ज घेण्यासाठी कचरत होते.

महिलांवर फोकस -
प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवायचे पूर्ण नाव माइक्रो यूनिट डेव्हलपमेंट रिफाइनेंस एजन्सी (Micro Units Development Refinance Agency) आहे. मुद्रा योजना (पीएमएमवाय)ची खास विशेषता ही आहे की, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या चार लोकांमागे तीन लाभार्थी महिला आहेत.
पीएमएमवायसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटनुसार २३ मार्च २०१८ पर्यंत मुद्रा योजनेच्या माध्यमातून २२, ८१४४ कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. सरकारने मुद्रा योजनेंतर्गत या वर्षी २३ मार्चपर्यंत २२,०५९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) लाभ?
मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत (पीएमएमवाय) कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.

मुद्रा योजनेचा (पीएमएमवाय) लाभ कोणाला मिळतो?
देशातील कोणीही व्यक्ती जो स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे तो पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो. जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवणार असाल व त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकता.
मुद्रा (पीएमएमवाय)मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात -
१-शिशु लोन : शिशु लोन अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
२-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
३-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

मुद्रा लोन (पीएमएमवाय) मध्ये कसा असतो व्याज दर?
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) माध्यातून मिळणाऱ्या कर्जावर निश्चित व्याज दर नाही. वेगवेगळ्या बँका मुद्रा लोनसाठी वेगवेगळा व्याज दर आकारू शकतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरुप व त्याच्याशी संबंधित जोखमीच्या आधारावर व्याज दर निश्चित केले जातात. सामान्यपणे कमीत कमी व्यार दर १२ टक्के आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?
मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.


बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊल. त्या आधारावर तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाईल. उद्योगाच्या स्वरुपाच्या हिशोबाने शाखा व्यवस्थापक तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो. पीएमएमवायविषयी अधिक माहितीसाठी 

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
https://vishalmultiservises.blogspot.com/

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज? प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 11, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.