.. निरोगी गाईचं दुध आणून चांगले तापवून त्याला किंचीत ताकाचे विरजण लावून. आठ तास तसेच ठेवावे. मग उत्तम चक्का.. दहि लागतं. ते लाकडाच्या रविने घुसळून त्यावर जे लोणि येत . हे औषधांसाठी वापरतात.. लोणि बळ वाढवते. ते स्वादु असतं शीतल असतं. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीने रोज सकाळी १०ग्राम लोणि व ६ग्राम खडिसाखर मिसळून खावे. कसलिहि मुरलेलि कडकि, गरमि असेल तर ती निघून जाते. हे अग्निदिपक आहे म्हणून नुकताच ज्वर येउन गेलेल्या रुग्णांनी रोज सकाळी..५ ग्रॅम लोणि, व ३ग्राम मध मिसळून घ्यावे...कास म्हणजे कोरडा खोकला.. यावर लोण्यासारखे औषध नाही..
लोणि बुद्धी वाढवणारे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी रोज लोणी खावे. भूक वाढवणारे आहे.
तेव्हा १० ग्रॅम लोणि, व ३ग्राम सुंठ घालून घ्यावे. थोड्याच दिवसात छान भूक लागते. व रक्त वाढतं
.ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी ३० ग्रॅम गाईचं ताजे लोणी, व १ग्राम पिंपळी चूर्ण व १ग्रम खडिसाखर मिसळून घेतल्यास थोड्याच दिवसात वजन वाढते.
लोणी धातु वर्धक आहे जेव्हा शरिरात सप्तधातू क्षिण होऊन व्यक्ति दुर्बल होते तेव्हा लोण्यासारखे सर्व धातू वाढवून मनुष्यांस पुष्ट करणारे दुसरं औषध नाही.. लोणि, मध, साखर, व पिंपळि हे चाटण घ्यावे.. क्षयरोग बरा होतो. पचनसंस्था बिघडली असेल तर, जिरेपूड २ ग्रॅम, लोणि१ ग्रॅम, व ३ ग्रॅम साखर असे दिवसातून दोन वेळा घेतल्यास बिघडलेले पोट ताळ्यावर येतं.
लहान मुले जर बारिक असतिल, रोडावली असतील , अंग धरत नसेल तर त्यांना रोज
लोणी साखर द्यावे . मुले धष्टपुष्ट होतात मूळव्याध त्रास असेलतर. आणि रक्त पडत असल्यास
१ग्राम लोणि, ,१ग्राम नागकेशर चूर्ण,३ग्राम साखर असं रोज सकाळी व संध्याकाळी घेत गेल्यास
रक्त थांबुन मूळव्याध बरि होते..
लोणि तापवून घेण्याचे फायदे.. १० ग्रॅम लोणि निखार्यावर गरम करून थोडि खडिसाखर व थोडं मध मिसळून घ्यावे. याने शक्ति येते, सुका खोकला बरा होतो, ताप येणे बंद होते
..... तेव्हा हा अत्यंत रूचकर पदार्थ आपण रोज खायला हवे. गोपिकांचा प्रिय कान्हा म्हणजे श्रीकृष्ण
यांचा तर हा आवडता पदार्थ आहे.... आणि आरोग्य दायि आहे....💦💦💦🍚..
No comments: