केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिकिंग करणे अनिवार्य केले आहे. करदात्यांना त्यांच्या परमनन्ट अकाऊंट नंबरवरुन (Pan Card) आधार लिंक करण्याचा यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची डेडलाईन, अंतिम मुदत 31 मार्च 2023 ही आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर , पॅन कार्ड रद्द होईल. त्याचा काहीच उपयोग करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बँकिंग, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बीएसई, एनएसई तुम्हाला व्यवहार करु देणार नाही. म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारांना थेट निर्बंध येतील.ज्या करदात्यांनी आतापर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्यांना सध्या 1000 रुपयांचे शुल्क आकारुन दोन्ही कार्ड लिंक करता येतील. दंड न आकारता ही डेडलाईन 30 जून 2022 ही होती. जर तुम्ही पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर आता 31 मार्च 2023 या अंतिम मुदतीपूर्वी ही जोडणी करुन घ्या.
तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.
जर तुम्ही अवैधरित्या पॅनकार्ड वापरल्यास आयकर अॅक्ट १९६१ च्या कलम २७२ बी अंतर्गत तुम्हाला पेनल्टीच्या रुपात १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
३१ मार्चपर्यंतच संधी
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)च्या मते, आयकर कायदा कलम २३४ एच नुसार, आधार पॅन लिंक न केलेल्या लोकांना ते काम करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम संधी आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन आधार लिंकिंगसाठी १००० रुपये लेट फी भरावी लागेल .
आधार पॅन असे करा लिंक
आयकराच्या अधिकृत संकेतस्थळावर लाॅग इन करा. क्विक लिंक्स सेक्शनवर जाऊन आधारवर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रिनवर एक नवी विंडो ओपन होईल. इथे तुम्ही तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. I validate my adhar details या पर्यायाची निवड करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओटीपी येईल..तो भरा आणि Validate वर क्लिक करा. दंड भरल्यानंतर तुमचे पॅन आधारशी लिंक होईल.
दंडाची रक्कम वाढूही शकते
बर्याच वेळा लोक चुकून एक किंवा अधिक पॅन कार्ड बनवतात. जरी ही पॅन कार्ड योग्य ओळख आणि तपशीलांच्या आधारे केली गेली असली तरी २०१६ पूर्वी आयकर विभागाला बर्याच तक्रारी आल्या. या तक्रारींमध्ये दोनपेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याचे उघड झाले. आपल्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास ती तात्काळ सरेंडर करणे गरजेचे आहे. आयकर विभागाच्या सुचनेनुसार जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर किमान ६ महिने आणि किमान १० हजार रुपये दंड आकारला जातो. ही शिक्षा आणि दंड वाढू शकतो.
घरबसल्या दुकानाचा परवाना व उद्योग आधार काढून मिळेल तेही अगदी माफक दरात
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
https://vishalmultiservises.blogspot.com/
No comments: