उन्हाळा ⛱️ सुरू
झाला की नकळत डासांची 🦟 संख्या वाढायला लागते आणि एरवी संध्याकाळच्या 🌄 वेळी येणारे डास 🦟 दिवसाही चावायला लागतात. घराच्या 🏡आजुबाजूला असलेला कचरा, गवत 🎋 आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे डास 🦟 आपल्या कानाशी👂🏻सतत गुणगुणत असतात. डास 🦟 चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग 🔥 होते आणि आपली चिडचिड 😫 व्हायला लागते. इतकेच नाही तर डास 🦟 चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही 📈 वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत.
डास 🦟 हे केवळ झाडं 🌳, साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही 🏝️ डासांचे प्रमाण वाढू शकते. याबरोबरच माश्यांचे 🐝 प्रमाणही या दिवसांत वाढलेले असते.
💁🏻♀️ यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच ❌ असे नाही. लहान मुले 👶🏻👧🏻 किंवा ज्येष्ठ नागरीकांना 👨🏻🦳👵🏻 त्याच्या उग्र वासाने 😤 त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? म्हणूनच घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून 🦟 सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
१. एका ताटलीमध्ये एक गोलाकार स्टँड 🫕 ठेवा.
२. त्यामध्ये ८ ते १० कडूनिंबाची पाने 🌿, २ तमालपत्र 🍃 आणि ४ लवंगा घाला.
३. यामध्ये कापूर आणि मोहरीचे तेल 🥄 घाला.
४. काडेपेटीची काडी लावून ती त्यामध्ये ठेवून द्या.
५. या मिश्रणाचा धूर होईल आणि एकप्रकारचा वासही 😤 येईल.
६. घरात सगळीकडे आपण धूप ज्याप्रमाणे फिरवतो त्याप्रमाणे ही ताटली फिरवा.
७. या नैसर्गिक गोष्टींमुळे डास 🦟 निघून जातात आणि हवा ♻️ शुद्ध होण्यास मदत होते.
No comments: