Full Width CSS

त्रिकटू चूर्ण..

 


आयुर्वेद हे विशाल ,सम्रुद्ध, आहे.. अनेक मौलिक औषधि यात आहे. असेच एक महत्त्वाचे औषध..त्रिकटु चूर्ण आहे..सुंठ, काळे मिरे, व पिंपळी. यांचे समभाग घेऊन तयार होते..सुंठ हि नवीन पेशी तयार करते, पिंपळी फुफ्फुसे स्वच्छ करून बळकट करते,पचन संस्था मजबूत करते, श्वसनमार्गाचे विकार बरे करते, काळे मिरे गॅस,  अपचन, अजिर्ण, दूर करून अन्नपचन चांगले करते, एकूणच  त्रिकटु चूर्ण हे मल्टिविटामिन आहे.रोगप्रतिकार शक्ती वाढवते...या चूर्णाबद्दल  भावप्रकाश मध्ये असे वर्णन आहे..


                  त्र्यूषणं दीपनं हन्ति श्वास-कास त्वगामयान्*

                   गुल्म मेह कफ स्थौल्य मेद: श्लीपदपीनसान्*.

थोडक्यात त्रिकटु चूर्ण अग्नी मांद्द, पीनस( सर्दि खोकला),गुल्म.वायू. मेह त्वचा विकार, खोकला, कुष्ठरोग, आमदोष, हत्ति रोग, गलरोग, बरे करते...


आपण याचे फायदे जाणून घेऊ या...

👇

  त्रिकटु चूर्ण कफ हर आहे अनेक वेळा आहार बदलतो, हवामान बदलतं, आणि श्वसनमार्गाचे विकार सुरू होतात, सर्दि खोकला, ताप, अंगदुखी, कणकण, असे त्रास होतात.अशा वेळी हे चूर्ण मधात मिसळून चाटण द्यावे दिवसातून दोन वेळा, लगेच बरे वाटते..(Help to clear excess kapha or mucous from the body)..


 . त्रिकटु चूर्ण हे भूक वाढवणारे चांगले औषध आहे, जेवणाच्या आधी लिंबाच्या रसासोबत घेतल्यास

 पाचक रस सुटुन छान भूक लागते.आणी नंतर पचन नीट होते, रस रक्त वाढते, त्यामुळे सिजनल आजार होत नाही. संग्रहणि, आव, इरिटेबल, सिंड्रोम बावेल, मध्ये हे चूर्ण, डाळिंबाचा रसासोबत दिल्यास आराम पडतो.रोज कुटजारिष्ट दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घेऊन हे चुर्ण घ्यावे.आराम पडतो...




..त्रिकटु चूर्ण हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, कारण यातिल सुंठ हि पचन नीट करून मेद या धातूला नियंत्रणात ठेवते,  तसेच. नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते,  त्रिकटू चूर्ण हे गोदंति भस्मासोबत घेतल्यास थायराईड कंट्रोल मध्ये राहतो. घशात संक्रमण झाल्यास, हे चूर्ण मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो, हिरडा, गुळ, व तिळ तेल  व त्रिकटू चूर्ण एकत्र करून खावे याने सर्व प्रकारचे त्वचा विकार बरे होतात.संधिवात, आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी या सर्व त्रासांवर

...त्रिकटु चूर्ण हे मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो,.आम दोष दूर करते, कारण

. शरिरातील आम म्हणजे, एक प्रकारचा विष दोष आहे, ( Trikatu Churna helps to take out excess impurities or ama from the body.).


त्रिकटू चूर्ण.. त्रिकटू चूर्ण.. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 28, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.