Full Width CSS

कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay)

 

कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay)


कोरडा खोकला घरगुती आयुर्वेदिक उपाय – काही वेळेस कोरडा खोकला होतो. कफ झालेला नसतो; परंतु त्याची ती पूर्वसूचना असते. घसा खवखवतो. अशा वेळी अगदी साधा उपाय करता येईल. उन्हातून आल्यावर कधीही अचानक थंड पाणी पिऊ नका. काही लोकांना खोकला सुरु झालं कि थांबत नाही त्या लोकांनी छाती चा X-Ray काढून डॉक्टर्स चा सल्ला घ्यावा(दमा किंवा टिबी चा त्रास असू शकतो). खोकला हा आजार घरगुती आयुर्वेदिक उपचारांनी नक्कीच बरा होतो. नियमित सूर्यनमस्कार आणि व्यायाम केल्याने शरीरातील घाम निघून खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण खूप कमी होत. Khokla Meaning in English is Cough.

खोकला लहान मुलांना असो किंवा जास्त वय असणाऱ्या माणसांना , खालील दिलेल्या उपाया किंवा औषधाने तो नक्कीच बारा होऊ शकतो.

कोरडा खोकला, कफ घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upchar Marathi)

1. एक ग्लास गरम पाणी घेणे. हे पाणी घशाला जेवढे सोसवेल तेवढे गरम घेणे. एक चिमटीभर बारीक मीठ त्यात टाकणे. एक चमचा मध टाकणे व अर्धे लिंबू पिळणे. चमच्याने हे मिश्रण चांगले ढवळावे व ह्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सकाळी उठल्यावर, तोंड धुतल्यावर प्रथम या ग्लासभर पाण्याच्या गुळण्या कराव्यात. अनेशापोटी गुळण्या केल्यावर एक तासाने चहाकॉफीसारखे पेय घेतल्यास चालते. असे दिवसातून तीनदा(गुळण्या) करावे. सकाळ, दुपार व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हे तीन दिवस केल्यास खोकला जातो. खवखव कमी होते. ह्या पाण्याच्या गुळण्या करताना थोडे थोडे पाणी गिळले गेले तरी अपाय होत नाही. उलट अन्ननलिका स्वच्छ होते.

Khokla Ayurvedic Gharguti Upay


2. काही वेळा खोकताना खोकल्याचा आवाज वेगळा येतो. कफ झाल्याची जाणीव होते. अशा वेळी काळ्या मियांचा औषध म्हणून
चांगलाच उपयोग करता येतो. सहा काळे मिरे घेऊन त्यांची पावडर करावी. त्यात जेवढा मावेल तेवढा गूळ घालून त्याची गोळी करावी. ही गोळी रात्रीच्या जेवणानंतर कमीतकमी एक तास जाऊ देऊन व झोपण्यापूर्वी घ्यावी. त्यावर पाणी पिऊ नये. असे तीन दिवस केल्यास कफ शौचावाटे पडून जाऊन बरे वाटते. मोठ्यांसाठी सहा मियांचा वापर, तर लहान मुलांसाठी तीनच काळे मिरे घ्यावेत. तीन वर्षांपर्यंत लहान मूल असेल तर त्या प्रमाणात मिरे एक किंवा दोनच घ्यावेत.


कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay) कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay) Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.