महावितरण वीज बिल दुरुस्ती & खराब मीटर अर्ज नमुना | application letter to mseb for faulty meter in marathi
बऱ्याचदा विजेचे मीटर खराब झाल्याने वीज बिल मर्यादेपेक्षा जास्त येते. अशा परिस्थितीत आपण विज विभागाला विज बिल दुरुस्ती अर्ज करू शकतो. असे केल्याने लवकरात लवकर आपल्या समस्येचे समाधान निघून गेले.
पुढे देण्यात आलेल्या विविध परिस्थितीत आपण अर्ज करू शकता:
- विजेचे मीटर खराब झाल्यावर नवीन मीटर बसवण्यासाठी अर्ज
- जास्तीची वीज बिल आल्याने विज बिल दुरुस्ती अर्ज
अर्ज नमुना 1 : विजेचे मीटर खराब झाल्यावर नवीन मीटर बसवण्यासाठी अर्ज mseb meter change application marathi
प्रति,
महाराष्ट्र विद्युत कंपनी
महावितरण,
पुणे- ४११००१
विषय: विजेचे मीटर खराब झाल्याच्या बाबतीत
सन्माननीय महाशय,
या अर्जाद्वारे आपणास सूचित करू इच्छितो की मी माझ्या घरी मागील 5 वर्षांआधी आपल्या कंपनीकडे विजेचे नवीन मीटर कनेक्शन घेतले होते. माझा ग्राहक क्रमांक: १२३४५६७८९ आहे. आजवर मला आपल्या कंपनी कडून कोणतीही समस्या आलेली नाही. परंतु मागील एक महिन्यापासून माझे मीटर विजेची होत असलेली रिडिंग दाखवीत नाही आहे. आणि मीटर मध्ये नेहमी सुरू असणारा लाईटही बंद झालेला आहे. नेहमी रिडिंग घ्यायला येणार्या कर्मचाऱ्यानुसार विजेचे मीटर खराब झाले आहे.
वीज कार्यालयात अनेकदा तोंडी तक्रार करूनही समस्येचे निराकरण झालेले नाही आहे. म्हणून आपणास विनंती आहे की लवकरात लवकर नवीन मीटर बसवून आमची समस्या दूर करावी. जेणेकरून रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य रीडिंग घेता येईल. धन्यवाद...
आपला विश्वासू
रोहित कुमार
रोहित विश्वास कुमार
ग्राहक क्रमांक: १२३५५६९४
मोबाईल नं.: १२३४५६७८९०
वडिलांचे नाव: विश्वास कुमार
गाव: पुणे
दिनांक: ०६/०४/२०२१
अर्ज नमूना २ : जास्तीची वीज बिल आल्याने विज बिल दुरुस्ती अर्ज | application letter to mseb for faulty meter in marathi
प्रति,
महाराष्ट्र विद्युत कंपनी
महावितरण,
पुणे- ४११००१
विषय: विज बिल दुरुस्ती अर्ज
महाशय,
या पत्राद्वारे तुम्हास सूचित करू इच्छितो की मागील 2 महिन्यांपासून मला मिळत असलेले विजेचे बिल खूप वाढले आहे. या महिन्यामध्ये सामान्य बिला पेक्षा जवळपास 2000 रुपये जास्त बिल मला मिळाले आहे. असे वाटत आहे की विजेच्या या बिलात अप्रत्यक्षपणे वाढ झाली आहे. आमच्या विजेचा वापर मी जाणून आहे. कारण मागील एक वर्षातील आमचे बिल 1000- 1500 च्या आत होते.
शेवटी माझी आपणास विनंती आहे की माझ्या या समस्येला गंभीरपणे घ्या आणि आपल्या कर्मचाऱ्याला योग्य तपास करायला पाठवा. वाढीव बिल मागील कारण काय आहे याचा लवकरात लवकर तपास लावावा जेणेकरून मलाही यामागील कारण लक्षात येईल.
धन्यवाद...
आपला विश्वासू
रोहित कुमार
रोहित विश्वास कुमार
ग्राहक क्रमांक: १२३५५६९४
मोबाईल नं.: १२३४५६७८९०
वडिलांचे नाव: विश्वास कुमार
गाव: पुणे
दिनांक: ०६/०४/२०२१
No comments: