ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो.
परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात.
सर्दीची कारणे :
थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो.
सर्दीची लक्षणे
नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, ताप आल्यासारखा वाटणे, दम लागणे अशी अनेक सर्दीच्या रुग्णात सामान्यपणे आढळून येतात. अनेक रुग्णांना तर 2-3 रुमाल घेऊन बाहेर पडावे लागते. नाक सतत गळत असते. अनेकांना एकावेळा 20-20 शिंका येतात. धुळीची अॅलजी असणा-यांना धुळीशी संपर्क येताच त्रास सुरू होतो. केवळ चादर झटकल्याचे निमित्त होऊन सर्दीचा त्रास सुरू होतो. औषधे घेतल्यास तात्पुरते बरे वाटते, परंतु परत सर्दीचा त्रास सुरू होतो. वीस-वीस वर्षांपासून सर्दीने त्रस्त असलेले अनेक रुग्ण मी प्रॕक्टीसमध्ये पाहिलेले आहेत.
सर्दीवरील उपचार :-
आयुर्वेदीय उपचारांच्या साहाय्याने जुनाट सर्दी देखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते. पंचकर्मापैकी एक असलेले ‘नस्यकर्म’ हे सर्दीच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे. विशिष्ट पद्धतीने औषधी तेल नाकात सोडण्याच्या प्रक्रियेला नस्यकर्म म्हणतात. नस्यकर्मामुळे नासामार्गातील दोष बाहेर पडून सर्दीची लक्षणे त्वरेने कमी होतात. अॅलर्जीमुळे होणा-या सर्दीमध्ये सुद्धा नस्याचा अतिशय उत्तम उपयोग दिसून येतो. यासोबतच काही आयुर्वेदीय औषधांचे सेवन केल्यास अनेक वर्षांच्या सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो.
काय करावे
◼️कोल्ड्रींक्स, आइस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
◼️केळी, काकडी, दही, टोमॅटो हे पदार्थ टाळावेत.
◼️गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये.
◼️पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे.
◼️केस धुतल्यानंतर लवकर कोरडे करावेत.
◼️शिंका जास्त येत असल्यास ‘क्षवथु तेल ’ नाकात टाकावे.
◼️रात्री सर्दीचा त्रास अधिक होत असेल तर झोपताना थोडे फुटाणे खावेत, त्यानंतर पाणी पिऊ नये.
◼️भाताचे प्रमाण कमी करावे.
◼️शक्यतो एसीचा वापर टाळावा.
No comments: