जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला मिळतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्.....

Full Width CSS



 तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून ऐकलं असेल किंला योगा करणारे गुरू सांगतात ते ऐकलं असेल की, जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. जमिनीवर झोपल्याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. 


चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे...


पाठदुखी दूर होते...

जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहित असल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. आणि हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा जाड गादीवर झोपल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. अशात खाली जमिनीवर झोपल्याने ही समस्या होणार नाही.


पाठीच्या मणक्याची समस्या दूर होते...

जमिनीवर झोपल्याने तुमचा स्पाइन म्हणजेच पाठीचा कणा सरळ होतो आणि त्यावर दबाव सुद्धा कमी पडतो. इतकेच नाही तर असे केल्याने तुम्हाला पाठीच्या कण्यासंबंधी समस्याही होणार नाहीत. पाठीचा कणा हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो शरीराच्या पूर्ण नर्व सिस्टीमला कंट्रोल करतो आणि याचा थेट संपर्क हा मेंदुशी असतो. 


बॉडी पोश्चर चांगलं होतं...

जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगलं तर वाटतं पण त्याने बॉडी पोश्चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्चर चांगला राहतो.


हाडांची समस्या दूर होते...

जमिनीवर झोपल्याने वाकडी-तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थिती येतात आणि त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू गतीने होते पण भविष्यात याचे अनेक फायदे बघायला मिळू शकतात. खाली जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइंट्समध्ये काही इजा झाली असेल तर ती सुद्धा याने बरी होऊ शकते.


हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर...

जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचं अलायमेंट चांगलं होतं आणि शरीरातील अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमच्या खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल. 

जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला मिळतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्..... जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला मिळतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्..... Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2023 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.