Full Width CSS

तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?



 तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?


काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडेही जातात पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया.


या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार...


१) तुमचा आहार योग्य आहे का...?


आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.


२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का...?


आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.


३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना...?


आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.


४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का...?


आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.


५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना...?


आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.


६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का...?


अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.


७) तुम्हाला ताण आहे का...? 


आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो


तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....? तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 26, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.