छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजामाता किंवा जिजाऊ भोसले यांना विसरुन अजिबात चालणार नाही. ज्या जिजाऊंनी शिवबांना घडवलं. पण त्यांच्या विषयीची संपूर्ण माहिती फारच कमी लोकांना माहीत असेल. म्हणूनच जिजामाता माहिती (Jijamata Information In Marathi) खास तुमच्यासाठी आम्ही एकवटली आहे. राजमाता जिजामाता भोसले यांची माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आपले लाडके शिवबा प्रत्येक वेळी दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी ही माता महान होती. तिच्या संस्कारांनी शिवबांना इतके मोठे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील जाणून घ्यायला हवेत. राजमाता जिजाबाई भोसले यांची माहिती जाणून घेताना त्यांचा जन्म, त्यांचे बालपण या विषयी सगळी माहिती जाणून घेणार आहोत. या शिवाय त्यांच्या जयंतीचे निमित्त साधत त्यांची आठवण करुन देण्यासाठी जिजाऊ जयंती स्टेटस (Jijau Jayanti Status) हे देखील जाणून घेणार आहोत.
Jijamata Information In Marathi | जिजामाता विषयी माहिती मराठी
राजमाता जिजाऊ करारी होत्या. स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी त्याचा छावा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करुन घेतले. त्यासाठी त्यांनी बरीच मेहनत केली. रयतेचा राजा अशी महाराजांची ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी जे काही केले ते वाखाणण्यासारखे आहे.
राजमाता जिजाबाईंची माहिती
राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. त्यांच वडील लखुजी जाधव आणि आई म्हासळाबाई जाधव होत. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजमाता असे त्यांचे नाव ठेवण्यात आले. पण त्यांना सगळे लहानपणी जिजाऊ असे म्हणत त्यामुळे त्यांना पुढे देखील त्याच नावाने ओळख मिळत गेली. जिजाऊ या स्वतंत्र्य अशा विचारांच्या होत्या. त्यांना कायमच आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल खूप प्रेम होते. त्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कायम वाटत असायचे. पुढे जाऊन त्यांनी संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जे स्वराज्यांचे संस्कार दिले त्यावरुन त्यांचे प्रेम दिसून येते. मराठी साम्राज्य स्थापन करण्यामागे जिजाऊंचा मोठा हातभार आहे.
जिजाबाई यांचे पूर्वजीवन
पूर्वी मुलींची बालविवाह केली जात. जिजामाता यांचे लग्नही लहान वयातच झाले. लखुजी जाधव हे निजामांधील एक सरदार होते. भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. सन 1609 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मोगल आणि आदिलशाहा यांच्या सेवेत गेला. पण तरीही ते शूरवीर योद्धे होते. त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती. वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील जहागींर मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या. जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण 8 मुले झाली. मोठा मुलगा संभाजी जे शहाजीराजांसोबत होते. तर त्यानंतर 6 मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. ज्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील संस्कार आणि जिजाऊ
जिजामाता यांना राजकारणातील अनेक दावपेच माहीत होते. त्यांच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते. पण यापुढे मराठ्यांचे राज्य यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. जिजामाता यांची दूरदृष्टी चांगलीच होती. स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ल्यापासून करायची हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडस्वारीचे प्रशिक्षण दिले. त्या स्वत: त्यामध्ये माहीर होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज शूर, धाडसी, बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले. त्यामागे जिजामाता यांचे योगदान आहे. लहानपणापासून त्यांनी मुलांना रामायण, महाभारत यांच्या कथा सांगून प्रेरित केले. त्यामुळेच त्यांच्यामध्ये धाडस आणि चांगले वाईट यांचे गूण रुजले.
एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवताना त्यांनी ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान देखील शिकवले. परकी स्त्री ही बहिणीसमान असावी असे त्यांनी कायम त्यांच्या मनात गुंतवले. इतकेच नाही तर पशुपक्षी, जनावरं या मुक्या प्राण्यांनाही मान देण्याचे शिकवले.
जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोहींना शिक्षा हे सगळे धडे दिल्यामुळे त्यांनी रयतेचा उत्तम राजा घडवला.
जिजामाता यांचे निधन
जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्वाचे होते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो. ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तो दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला. त्यानंतर अगदी 12 दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 16 जून 1674 रोजी त्यांचे निधन झाले. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली. पण त्यांच्या संस्कारांचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अशी ही धन्य माता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही.
No comments: