Full Width CSS

ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 1,27,000 रुपये अनुदान, योजनेचा लाभ असा घ्या


 

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून चांगले पीक काढावे जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा दोन्हींचा विकास व्हावा यासाठी सरकारने खास योजना सुरु केली आहे.

राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांना ठिंबक व तुषार सिंचनासाठी सरकारकडून भरघोस अनुदान मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन या दोन योजनांतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना आणली आहे. (Thibak Sinchan Yojana) या योजनेमार्फत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना आता 90 टक्के अनुदानाचा लाभ होणार आहे.
अनुदान किती मिळणार..?
शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार आहे, म्हणजेच जवळपास हेक्टरी 1 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लॅटरल अंतरानुसार अनुदान दिलं जाते. 1 हेक्टर ठिबक सिंचनसाठी 80 टक्के अनुदान दिले तर 1,2001 रुपये तर तुषार सिंचनासाठी 19,355 रुपयांपर्यंत मदत दिली जाते.Thibak Sinchan Anudan Maharashtra 2023 ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा सर्वसाधारण शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 75 टक्के अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्यांना 90  टक्के अनुदान दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
Tushar Sinchan Yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक व तुषार योजनेचा ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 1,27,000 रुपये अनुदान, योजनेचा लाभ असा घ्या ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 1,27,000 रुपये अनुदान, योजनेचा लाभ असा घ्या Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 10, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.