आहाराचे नियोजन करतांना सुरवातीला एका आठवड्याचे नियोजन करावे. आठवड्यात आपणं 14 वेळा जेवणार आहोत...
मग डाळ कांदा 3/4 वेळा पालेभाजी 3 वेळा, फळभाजी 3 , कडधान्य 2 वेळा , मांसाहार / अंडी / मत्साहार 2 वेळा..यात शाकाहारी असाल तर पनीर /श्रीखंड / थालपिठं / पराठे यांचा सामावेश करावा.
प्रथिनांसाठी आज सोयाबिन हे उपलब्ध आहे. त्याचे दुध घरी बनवता येते त्यासाठी वाटीभर सोयाबीन रात्री गरमपाण्यात भिजत घालावे. सकाळी टरफले काढून मिक्समध्ये दळावे व चारपट पाणी घालून पातळ करून प्यावे. ह्याच सोयाबिनचे पनीर टोफू नावाने उपलब्ध आहे.
आहारात लोह मिळवण्यासाठी पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवून काढून ठेवाव्यात. जिरे , मोहरी , कोथंबीर घालून ताक दुपारी घ्यावे. ताक + भात शरीरात रक्त वाढवतो.
हिरव्यापालेभाज्या :- यामध्ये भरपूर लोह , व्हिटामिन्स असतात मात्र यांचा हिरवारंग हा क्लोरोफिल ह्या घटकाने येतो व हे शरीरातील विषारीद्रव्ये बाहेर टाकायला मदत करते. याला हिरवं रक्त म्हणून म्हणतात.
फळ भाज्यांचे सुप करून त्यात पालकाच्या पानांची पेस्ट घातली की छान क्लिझींग ज्युस बनतो व तो शरीरातील मलमूत्र साफ करतो .टवटवी व शक्ती मिळते म्हणून रोगप्रतिकारशक्ती हि सर्व घटकांवर अवलंबून असते. फक्त एखाद दुसरा घटक घेऊन नाही.
आयुर्वेद म्हणून ऋतुनुसार आहार घ्यायला सांगते. हिवाळ्यात खुराक म्हणून खारीक खोबरे उडीदडाळ लाडू मेथी लाडू म्हणून आपण खातो. हि सर्व प्रथिने आपल्या शरीरात धातुबळ वाढवून रोगप्रतिकारक्षमता वाढवतात.
No comments: