Full Width CSS

पोलीस भरतीची तयारी कशी करावी

 

पोलीस भरतीची तयारी कशी करायची? एवढंच करा यश तुमचेच!

 

पोलीस भरतीच्या नवीन टीप्स वाचूया. पोलीस कॉन्स्टेबल व्हायचंय, SRPF व्हायचंय अशी अनेक स्वप्न उराशी घेऊन तरुण पोलीस भरतीच्या दिशेने धावत असतात. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ही एक सरकारी नोकरी आहे. जी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत येते. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी भरती जाहीर केली आहे. कॉन्स्टेबल म्हणून करिअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे ज्या उमेदवारांना पोलिसात भरती व्हायचं आहे ते परीक्षेसाठी त्यांची पात्रता तपासू शकतात आणि त्यासाठी तयारी करू शकतात.

पोलिसात करिअर करण्याची ही पहिली पायरी आहे. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे उमेदवार पोलीस भरतीची परीक्षा देऊन आपल्या करिअरची सुरुवात करू शकतात. महाराष्ट्र पोलीस भारतीमध्ये उत्कृष्ट करिअर ग्रोथ आहे. ज्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा स्थिर सोर्स मिळतो आणि सोबतच खाकी वर्दीच्या अभिमानाची भावना ह्या नोकरीतल्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. ज्या दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवारांना आकर्षित करतात. आणि मग पोलीस भरतीची वाट पाहणारे उमेदवार पोलीस भरतीसाठी तयारी कशी करावी ह्या चिंतेत पडतात.
पण मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी कशी करावी ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन ह्या लेखात करण्यात आलेलं आहे.उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि उत्तम तयारी असलेल्या तरुणांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ही महत्वाकांक्षा आहे. 18 वर्षीय तरुण कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळते म्हणून ह्या भरती साठी प्रयत्न करतात.

हे लक्षात घेऊन राज्यातील तरुणांसाठी राज्य सरकार कडूून भरती प्रक्रिया राबवण्यात येते. पोलिस भरतीसाठी उमेदवार किमान 18 वर्षांचा आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचा (मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची वाढ आहे)र्वप्रथम, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या तयारीसाठी योग्य वेळापत्रकाने सुरूवात करा. ज्याची सुरुवात सकाळच्या व्यायामापासून सकस नाश्त्याने करा. कारण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचे पद भूषवण्यासाठी ग्राउंड परीक्षा खूप महत्वाची आहे.

तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तयारी सुरू ठेवा, आणि महत्वाचं म्हणजे नियमित वाचन जे या परीक्षेत यश
मिळवून द्यायला करेल.

स्वतःच्या नोट्स तयार करणे आणि दैनंदिन सराव हा ह्या पोलीस भरतीच्या खडतर परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतःच्या नोट्स तयार करून तयारीला सुरुवात करा आणि त्यांचा नियमित सराव करा.
कोणतीही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चालू घडामोडी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून दररोज 1-2 तास चांगलं वर्तमानपत्र वाचा जे तुमचे सामान्य ज्ञान सुधारण्यात मदत करेल. स्वतःला अपडेट ठेवा.

तुमचं स्वतःचं वेळापत्रक तयार करा

योग्य वेळापत्रक सर्व अभ्यासक्रमांना महत्त्वाच्या विषयांना तयारीसाठी किती वेळ लागेल त्याचा अंदाज घेऊन बनवा. आधी तुमचं स्वतःचं वेळापत्रक बनवा मग महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेऊन त्यानुसार सुरुवात करा. प्रत्येक विषयासाठी दररोज 2-3 तास द्या म्हणजे तुम्ही परीक्षेपूर्वी सर्व विषय अगदी व्यवस्थित तयार करू शकता.

सर्व महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा

मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची तयारी करताना ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
ह्या लेखात खाली दिलेल्या प्रत्येक विषयाचा तपशीलवार अभ्यासक्रम पहा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने संपूर्ण अभ्यासक्रमातील महत्त्वाचे विषय गोळा करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या पद्धतीबद्दल स्पष्टीकरण मिळू शकेल.

वेळेचं व्यवस्थापन असं करा

ग्राउंड आणि लेखी दोन्ही परीक्षा कव्हर करण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. अंतिम परीक्षेसाठी दिलेल्या वेळेत दररोज तीन ते चार प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या विषयांवर जास्त वेळ घालवा. वेळेचं योग्य व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने पुढे नेते.

हुशारीने तयारी करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे. आम्ही सुचवितो की मागील वर्षाच्या अनेक प्रश्नपत्रिका गोळा करा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा सराव करत असताना तुम्हाला अंतिम परीक्षा सोडवण्याची क्षमता मिळेल. आणि सराव माणसाला परिपूर्ण बनवतो म्हणून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करत राहा.

मॉक टेस्टची तयारी करताना…

एकदा तुम्ही सर्व अभ्यास पूर्ण केल्यानंतर मग मॉक टेस्ट घेण्यास सुरुवात करा. मॉक टेस्टमुळे तुमचे वेळेचे व्यवस्थापन सुधारेल. दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या अंतिम परीक्षेत तुम्ही सर्व प्रश्नांचा प्रयत्न करू शकाल.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा

पोलीस कॉन्स्टेबल निवडीमध्ये ग्राउंड टेस्टचा समावेश असल्याने, महाराष्ट्र राज्य सरकारच्या नियमानुसार ग्राउंड टेस्ट ही संपूर्ण निवड प्रक्रियेची पहिली फेरी असेल ही फेरी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल त्यामुळे तुमचं वजन त्यानुसार ठेवणं महत्त्वाचं आहे. तुमच्या उंची आणि वजन ह्या मानकांनुसार स्वतःला मेन्टेन करा. तसेच परीक्षेच्या एक महिन्यापूर्वी ह्या कामाला सुरुवात करा. अभ्यासाचा कोणताही ताण घेऊ नका कारण ह्या खडतर परीक्षेची तयारी करताना मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे.

पात्रता निकष, अभ्यासक्रम, अभ्यास साहित्य शैक्षणिक पात्रता इत्यादींसंबंधी तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे. कृपया हे सगळं नीट वाचा आणि आगामी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची चांगली तयारी करा.

पात्रता निकष काय आहेत?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पात्रता निकष खाली दिले आहेत.

वयोमर्यादा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष असायला हवं.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 28 वर्ष असायला हवं. राखीव प्रवर्गासाठी वयात सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त राज्य मंडळातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

शारीरिक पात्रता

महिला उमेदवारांची किमान उंची 155 सेमी आणि पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेमी आणि किमान 80 सेमी असावी.

पोलीस भरती साठी काय तयारी करावी लागेल?

मित्रांनो, आता पोलीस भरतीच्या पूर्ण निवड प्रक्रियेमध्ये बदल केला गेला आहे. आता पहिल्या सारखी सरळ सोपी पोलीस भरती राहिली नाही. भावी पोलिस अधिकारी हा शरीराने आणि बुध्दीने बळकट असायला हवा ह्यासाठी पहिली लेखी परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि नंतर ग्राऊंड पारख होणार. ग्राउंड पास झाल्यावर लेखी परीक्षा होणार आहे. म्हणून आता परीक्षेची दोन्ही अंगांनी तयारी महत्वाची आहे.

लेखी परीक्षा १०० गुणांची आणि
ग्राऊंड परीक्षा ५० गुणांची असेल.महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी सर्वात महत्वाच्या तयारीच्या टिप्स म्हणजे अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती मिळवणे. अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासाबद्दल स्पष्टीकरण देईल. हे सर्वात महत्वाचे विषय ओळखण्यात मदत करेल ज्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम अतिशय सोपा आणि मर्यादित असल्याने त्याची तयारी सहज सुरू करता येते.

हा अभ्यासक्रम पाचवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

अंकगणित
लेखी परीक्षेत ह्या विषयावर २० प्रश्न विचारलेले असतात. अंकगणित अभ्यासताना तुम्हाला पाढे, सूत्र, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाचे सूत्रे, संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, लसावी व मसावी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा, सरासरी ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही सुरु करा.

सामान्यज्ञान व चालू घडामोडी
ह्या

विषयावर साधारणत: ४० प्रश्न विचारले जातात. त्यात भारत व जागतिक भूगोलासंदर्भातील प्रश्नही विचारले जातात. भारताच्या इतिहासासंबंधातील प्रश्नांची संख्या कमी असली तरीही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती, आंदोलने, चळवळी, अहवाल, वृत्तपत्रे, समाजसुधारक यांचा अभ्यास करावा.

विज्ञान

शोध- संशोधक, अणुशक्ती आयोग व अणुऊर्जा केंद्रे, संशोधन संस्था, संरक्षण क्षमता, मानवी आहारातील घटक, मानवी श्वसन संस्था, नियोजित अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र टेस्ट असे विषय अभ्यासाला घ्या. बुद्धिमत्ता चाचणी- बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या अभ्यासासाठी सराव महत्त्वपूर्ण ठरतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अंकमालिका, अक्षरमालिका, अक्षरमाला, सांकेतिक लिपी, सांकेतिक चिन्ह, भाषिक संकेत, सम आणि व्यस्त संबंध, वेळ, दिशा, रांगेतील क्रम, नातेसंबंध यावर बेतलेले असतात.

मराठी व्याकरण

पोलीस शिपाईपदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये सुमारे २० प्रश्न विचारले जातात.

शारीरिक चाचणी
महिलांसाठी
धावणे (८०० मी.) – ३० गुण,
धावणे (१०० मीटर) – १० गुण,
गोळाफेक (४ किलो वजन) – १० गुण,

पुरुषांसाठी
धावणे (१६०० मी.) – ३० गुण.
धावणे (१०० मीटर) – १० गुण,
गोळाफेक (७.२६० किलो वजन)- १० गुण,

मैदानी चाचणीत चांगले गुण मिळविण्यासाठी सराव आणि फिटनेस महत्त्वाचा ठरतो. ह्यासाठी तुम्ही दररोज सकाळचे दोन तास मैदानावर सराव केला तरी भरपूर आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे

गणित
एचसीएफ
LCM
संख्या प्रणाली
सरासरी
गुणोत्तर आणि प्रमाण
साधे आणि चक्रवाढ व्याज
वेळ आणि काम

भूमिती
टक्केवारी आणि सवलत
क्षेत्रफळ आणि खंड

सामान्य इंग्रजी आणि मराठी व्याकरण
व्याकरण
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
शब्दसंग्रह
वाक्प्रचार
भाषेचा योग्य वापर

बुद्धिमत्ता चाचणी
शाब्दिक
अशाब्दिक
प्रॉब्लेम्स सोडवणे
दिशा चाचणी
शब्द व्यवस्था क्रम
वर्णमाला आणि संख्या मालिका
उपमा
रक्ताची नाती
कोडिंग/डीकोडिंग
डेटा इंटरप्रिटेशन

सामान्य विज्ञान

भारतीय राजकारण
खेळ
भारतीय संस्कृती
भारताचा इतिहास
भारतीय भूगोल
महत्त्वाचे पुरस्कार आणि मान्यता
संगणक ज्ञान
विज्ञान आणि तंत्रज्ञान
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा नमुना

उमेदवारांना परीक्षेच्या लेखी पद्धतीबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून उमेदवार महत्त्वपूर्ण विषयांवर लक्ष केंद्रित करू शकतील.
परिक्षा एकूण 100 गुणांची असेल, परिक्षेचा एकूण कालावधी 90 मिनिटे इतका असेल.

महाराष्ट्र पोलीस

 

 कॉन्स्टेबल परीक्षेच्या पॅटर्नचे तपशील खाली दिल्याप्रमाणे आहेत.

गणित:
प्रश्नांपैकी: 25
गुण: 25
प्रकार : वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न

सामान्य इंग्रजी आणि मराठी व्याकरण
प्रश्नांची संख्या: 25
गुणांची संख्या: 25
प्रकार : वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न

रिझनिंग
प्रश्नांची संख्या: 25
गुणांची संख्या: 25
प्रकार : वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न

सामान्य विज्ञान
प्रश्नांची संख्या: 25
गुणांची संख्या: 25
प्रकार : वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न
एकूण क्र. प्रश्नांची संख्या: 100

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत यश मिळेलच. त्यासाठी हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर उत्तरं पाहा.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण

 

होण्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का?
नाही, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा एकूण कालावधी किती आहे?
पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा एकूण कालावधी ९० मिनिटे आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत प्रत्येक विषयासाठी वेळ आहे का?
नाही, प्रत्येक विषयासाठी विभागीय वेळ नाही. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही विषय निवडा.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ लागतो?
ह्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तीन ते चार महिने पुरेसे आहेत. उमेदवार योग्य वेळापत्रकासह 3-4 महिन्यांत संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकतो आणि ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दररोज 3-4 तासांचा अभ्यास पुरेसा आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पास करण्यासाठी काही फिजीकल टेस्ट आहे का?

होय, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फिजिकल टेस्ट ही पहिली फेरी आहे. ही फेरी पूर्ण केल्यावर तुम्ही लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र व्हाल.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
तुम्हाला किमान बारावी पास असायला हवं.

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

पोलीस भरतीची तयारी कशी करावी पोलीस भरतीची तयारी कशी करावी Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 07, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.