खालील अटींची पूर्तता करणारे होतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील :
1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शोतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी. या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
2. शेतकऱ्याच्या स्वत: च्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. सोबत विहित प्रपत्रातील नमुना जोडला आहे.
3. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.
4. यापुर्वी महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.
No comments: