Abha Health Card : (Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर हे कार्ड प्रत्येक व्यक्तीबाबत त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती डिजिटल स्वरुपात संग्रहित करुन ठेवणार आहे. या कार्डची नोंदणी करतेवेळीच आजार आणि त्यावरी उपचाराची माहिती घेतली जाणार आहे. (read all details and benefits of abha health card )
(What is Abha card?) आभा हे एक डिजिटल स्वरुपातील कार्ड आहे. यामध्ये कोणत्याही रुग्णाच्या आजाराची माहिती आणि त्याच्या उपचार पद्धतीची नोंद केली जाणार आहे. ज्यामुळे सदर रुग्णाची medical history तपासणं अधिक सोपं होणार आहे. या 14 आकडे असणाऱ्या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा युनिक आयडी तयार होणार आहे.
No comments: