एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.
१. पोट साफ होण्यासाठी
एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.
२. डोळ्यांच्या विकारांवर
रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.
३. आमवात आणि सांधेदुखी
युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.
४. लहान मुलांसाठी
लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.
५. गर्भवतींसाठी
गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
६. रक्तदोषात गुणकारी
अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.
७. उत्तम झोपसाठी
अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो
No comments: