Full Width CSS

"मागेल त्याला शेततळे" योजना

 


  • राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “ मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.
  • राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.

    प्रक्रिया

    इच्छुक शेतकऱ्यांचे विहित नुमन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्यांची मागणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना प्रपत्र-2 इच्छुक लाभार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावेत. ऑनलाईन अर्जांची पावती इच्छुक लाभार्थ्यांनी डाउनलोड करुन स्वत:कडे ठेवावी.

    ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीने “आपले सरकार” या संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याचा शेततळे या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदारास पुढील तीन पर्याय उपलब्ध राहतील. यापुर्वीच तयार केलेल्या प्रोफाईलचा वापर करणे किंवा प्रोफाईल उपलब्ध नसल्यास नव्याने प्रोफाईल तयार करुन वरील कोणत्याही महा ई सेवा केंद्रामार्फत सीएससीमध्ये प्रथम प्रोफाईलसाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत:च्या अथवा सायबर कॅफेतील संगणकाचा वापर करुन अर्ज भरु शकतो. अर्जासाठी सेवा शुल्क 20 रुपये अधिक सेवाकर लागू राहिल. अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक नसल्यास महा ई सेवा केंद्रातून अर्ज भरत असताना ही प्रक्रिया महा ई सेवा केंद्र चालकामार्फत करावी.

    शेततळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे लागू राहतील.

    लाभार्थी पात्रता

    1. शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमितकती 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
    2. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरीता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहिल.
    3. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.

    लाभार्थी निवड

    १. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल.

    २. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.

"मागेल त्याला शेततळे" योजना "मागेल त्याला शेततळे" योजना Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.