Full Width CSS

आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात !!



 आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात !! 


तेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडीकल्स निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि त्यामधले अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.


चला तर जाणून घेऊ तेलाच्या पुनर्वापराचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.


रोजच्या खाण्यामध्ये नियमित खाण्यात येणार पदार्थ म्हणजे तेल. जवळपास सर्वच घरात पुरी, भजी, तळण हे जेवणामध्ये खाल्लेच जाते. त्याचबरोबर पुरी, भजी, तळण तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल देखील अनेक जण पुन्हा दुसरा पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला हे माहित आहे का? कि हे एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणं आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते ?


नाही ?,  तर जाणून घ्या. 


तेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडीकल्स निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि त्यामधले अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. चला तर जाणून घेऊ तेलाच्या पुनर्वापराचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते.


जर तुम्ही एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरत असाल तर त्याने कॅंसरचा धोका वाढू शकतो. तेल सतत गरम केल्याने त्यातील अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात आणि फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. त्याने यामध्ये कॅंसर उत्पन्न करणारे घटक वाढतात. आणि हे घटक अन्नाद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे पोटाचा कॅंसर, पित्ताशयाचा कॅंसर, यकृताचा कॅंसर इत्यादी रोगांचा धोका वाढू शकतो .


वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्याने हृदयविकाराची समस्याही उद्भवू शकते. एकदा वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. वापरलेले तेल पुन्हा जास्त आचेवर गरम केल्याने त्यातील फॅट्स ट्रान्स फॅट्समध्ये रूपांतरित होते, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा तेलाचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.


वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तेलाच्या पुनर्वापरामुळे पचनासही त्रास होतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या समस्याही उद्भवतात.


एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने चरबी वाढून लठ्ठपणाही वाढू शकतो. त्याचबरोबर वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करून तयार केलेले अन्न सेवन केले तर मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वापरलेले तेल पुन्हा वापरणे शक्यतो टाळावे.


उच्च रक्तदाब असेल तरी तेलाचा पुनर्वापर करणे टाळावे. आधीच वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रॅडिकल्समुळे, रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो.

आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात !! आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात !! Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.