Full Width CSS

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज.

 


आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, यासाठी योजना राबविली जाते.या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज (Business Loan) उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळात भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळत आहे. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीच्या काळात महामंडळाचे कर्ज मिळविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता.

पात्रता

  • या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.
  • ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत कोणतीही थकबाकी नसावी.
  • या कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय पन्नास वर्षांपेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • वीज बिल
  • शिधापत्रिका
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • व्यवसाय फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँकेचा CIBIL अहवाल
  • दुकान कायदा परवाना किंवा उद्योग आधार
  • करावयाच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल173 जणांना 10 कोटींचे कर्ज
    • महामंडळातर्गत जिल्ह्यातील 106 जणाना 10 कोटी 33 लाख 92 हजार 973 रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज परतावा मंजूर केला जात आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.