मागेल त्याला शेततळे आणि सामूहिक शेततळे या योजना बंद झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे (Farm Pond Scheme) या बाबीचा समावेश केला. आता 2022-23 या आर्थिक वर्षात वैयक्तिक शेततळ्यांचे वार्षिक उद्दिष्ट गाठण्यासाठी जेमतेम दीड महिन्याचा कालावधी उरलेला आहे.यामध्ये ऑनलाइन अर्ज, अर्जाची छाननी, जागेची आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड इत्यादी कामे कशी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याची साठवणूक करण्याकरिता शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी केली तर सिंचनासाठी हे पाणी उपयोगात आणता येईल. यापूर्वी राज्य शासनाने राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी शेततळे योजना अनुदानावर राबविलेली होती.ही योजना राबवताना प्रामुख्याने शेततळ्यासाठी जागा निश्चित करताना योजनेमध्ये पुढील बाबींची खातरजमा केली जाते.
- इनलेट / आऊटलेटविरहित प्रकाराच्या शेततळ्यात पाणी भरण्याची कार्यवाही पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून प्राधान्याने करावी.
- ज्यांची शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्यात यावे.
- बागायतदार अथवा मोठे जमीनदार शेतकरी ज्यांच्याकडे उसाचे क्षेत्र जास्त आहे.लाभार्थी शेतकऱ्याने आपले शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजना आणि शेततळ्यासंदर्भातील माहितीचा फलक शेततळ्यापाशी लावणे बंधनकारक आहे.
- अधिक माहितीसाठी संपर्क साधा
- 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
- (आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
- मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: