Land Registration ID : पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेची नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीचं नोंदणी क्रमांक म्हणजेच “Land Registration ID” लागतो.
लँड रजिस्ट्रेशन (Land Record) आयडी म्हणजे काय ? आणि लँड रजिस्ट्रेशन आयडी आपल्या 7/12 उतारावरती कसा शोधावा ? या बदलाची सर्व माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
Land Registration ID
ज्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला एक ओळख म्हणून आधार क्रमांक किंवा मतदान कार्ड देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आता महसूल विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. त्या क्रमांकाला ULPIN क्रमांक या नावाने ओळखल जाणार आहे.हा नंबर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक 7/12 उतारावरती पहायला मिळेल. सातबाऱ्यामध्ये विशिष्ट जमिनीशी संबंधित भूवैज्ञानिक माहिती देण्यात येते, जसे की मातीचा प्रकार आणि भूखंडाचा आकार. यात पिके, सिंचन आणि इतर कृषी तपशीलांशी संबंधित माहिती देखील समाविष्ट आहे.
लँड रजिस्ट्रेशन आयडी हा एक युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असून तो वेगवेगळ्या शेतजमिनीला नियुक्त केला जातो. महाराष्ट्रमध्ये याच नंबरला ULPIN नंबर सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आहे Unique Land Parcel Identification Number असा आहे.
No comments: