शेतकऱ्यांना जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये अनुदान सरकारकडून दिला जाणार आहे. या योजनेबद्दलची (Mahadbt) संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि त्याच्या अटी या बद्दलची माहिती देखील जाणून घेणार आहोत. त्या साठी हा लेख शेवट पर्यंत वाचा…..
शेतीच्या सिंचनासाठी विहीर ही अतिशय महत्त्वाची आहे. आता विहारीशिवाय शेती करता येत नाही. शेतात विहीर किंवा बोर असणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. सरकारकडून आता अशीच एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे “डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ”. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्ती (Juni Vihir Durusti) साठी 50 हजार रु. अनुदान दिला जातात.
Juni Vihir Durusti Yojana
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा.
- ८ – अ उतारा.
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी दिव्यांग असल्यास त्याचा दाखला.
- कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी पत्र.
- विहीर असलेल्या जमिनीचा सर्वे गट नंबर नकाशा व चतुरसीमा.
योजनेसाठीच्या अटी
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ फक्त अनुसूचित, SC, ST प्रवर्गातील शेतकऱ्यानं मिळतो.
- योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १ ते १.५ लाखापर्यंत.
- जमिनीचा 7 12 व आठ-अ उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे अतिशय आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे किमान अर्धा एकर ते सहा एकर पर्यंत जमीन असणे आवश्यक.
No comments: