Vihir Anudan Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान मिळणारं आहे. त्यानुसार, राज्यात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं सांगितलं आहे.
विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यांची पात्रता काय आहे ? यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? या बदलाची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Vihir Anudan Yojana
लाभधारकाची पात्रता
- अर्जदाराकडे कमीत कमी 1 एकर शेतजमीन असावी.
- अर्जदाराच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
- एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा.
- अर्जदार हा जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे.
लाभधारकाची निवड कशी होते ?
या योजनेत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, शासन निर्णयानुसार.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)
आर्थिक मदत किती ?
महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकार आणि दर निश्चित करणं शक्य नाही.
त्यामुळे मग विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा येईल. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यानं विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येईल. असं शासनाने स्पष्ट केलं आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: