आयुर्वेद ला जीवनाचे शास्त्र का म्हणतात.
संपूर्ण ब्रम्हांड हे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंच महाभूतांनी बनलेले आहे. ही पंच महाभूते आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा स्त्रोत आहेत आणि म्हणून एकमेकाशी ताळमेळ राखत ते शरीरभर व्याप्त असतात. आयुर्वेद देखील पंच महाभूतांच्या सिद्धांतावर कार्य करते. शरीरातील या पंच महाभूतांच्या संतुलनावर आपले आरोग्य टिकून असते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा स्त्रोत इतर स्त्रोतांपेक्षा जास्त प्रमाणात असतो आणि त्यावर त्या व्यक्तीची प्रकृती बनत असते. शरीराचे प्राकृतिक दोष असे असतात.
कफ दोष --- पृथ्वी आणि जल तत्व जास्त असणे
वात दोष --- वायू आणि आकाश तत्व जास्त असणे
पित्त दोष --- अग्नी तत्व जास्त असणे
हे दोष व्यक्तीचे शरीर, प्रवृत्ती (आहाराची आवड, पचन), मन आणि भावनांना प्रभावित करतात.
समजा एखादा कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मजबूत शरीरयष्टी, मंद पचन, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि भक्कम भावनात्मकतेमुळे पृथ्वी तत्व स्पष्ट दिसते. बहुतांश व्यक्तींची प्रकृती दोन दोषांच्या संयुगांची बनलेली असते. जेंव्हा वात, पित्त आणि कफ यांच्यामध्ये संतुलन नसते तेंव्हा या दोषांच्या असंतुलनाची लक्षणे प्रकट होतात.
या पुढील पोस्ट मध्ये आपण वात, पित्त आणि कफ या प्रकृती वर बोलणार आहोत. तसेच या मुळे होणारे आजार प्रकृती नुसार काय खावे व काय टाळावे हे पहाणार आहोत.
No comments: