Full Width CSS

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, ‘सिबिलची’ अट रद्द.



शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज (Agriculture loan) घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोरची (Cibil Score) अट लावता येणार नाही.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणारं.

सहकार विभागाला निर्देश

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही अट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाला (Department of Cooperation) यासंदर्भात निर्देश दिले आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून अल्प मुदतीत पीक कर्ज देण्यासाठी सिबील अट किंवा सिबील स्कोरचा संदर्भ न देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलंय आहेत. 

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, ‘सिबिलची’ अट रद्द. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, ‘सिबिलची’ अट रद्द. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.