Document Upload: नमस्कार मित्रानो या लेखात आपण पशुसंवर्धन विभाग या योजनेचा संपूर्ण तपशील कागदपत्रे अपलोड करने, आपली लाभार्थी निवड चेक करने, तसेच अटी व नियम जाणून घेणार आहोत.
दुधाळ गाई, म्हशी, शेळी पालन कुक्कुटपालन अशा विविध योजनांचे पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज मागवण्यात आले होते.२०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तसेच चालू वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आता कागदपत्र अपलोड करायचे आहेत. document upload
पशुसंवर्धन विभाग सूचना
सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे.
लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची आतिम मुदत दि.११/२/२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५ – २६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “EVDTEC” या नावाने SMS प्राप्त झाला आहेस. अश्याच लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील ५ वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.
योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.
ग्रामपंचायत सर्व दाखले मिळवा मोबाईलवर Gram Panchayat Certificates Download
आवश्यक अपलोड कागदपत्रे ? * असे चिन्ह असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
*फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य
*सातबारा (अनिवार्य)
*८ अ उतारा (अनिवार्य )
*अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र.
*आधारकार्ड (अनिवार्य )
*७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा.
*अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)Saveरहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र. (असल्यास अनिवार्य)
बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
राशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. (अनिवार्य )
दिव्यांग असल्यास दाखला (अनिवार्य )
बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.
वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
शैक्षणिक पात्रतेचा दाखला
रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रतSaveप्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
अशी असणार निवड प्रक्रिया ?
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ प्रणालीद्वारे लाभार्थींना एसएमएस पाठवणे
४ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ वार्षिक तसेच या वर्षाच्या लाभार्थी कागदपत्रे अपलोड करणे
१२ फेब्रुवारी २०२३ एक दिवस राखीव ठेवत
१३ ते २0 फेब्रुवारी २०२३ या दरम्यान पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सक्षम चालक कागदपत्रे निवडून पूर्ण करणे.
२१ फेब्रुवारी २०२३ एक दिवस राखीव ठेवत.
२२-२३ फेब्रुवारी २०२३ लाभार्थी अंतर्गत कागदपत्रातलता पूर्तता करने.
२४ फेब्रुवारी २०२३ कागदपत्रे अंतिम पडताळणी करने
२५ फेब्रुवारी २०२३ एक दिवस राखीव ठेवत.
२६ फेब्रुवारी २०२३ अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करने.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: