मस्कार मित्रानो या लेखात आपण १०० रुपयात जमीन नावावर कशी करता येणार याबद्दल जाणून घेणार आहोत.
जमीन हस्तांतरणासाठी म्हणजेच कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क हा भरावा लागतो.मात्र आता जमीन हस्तांतरणासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात खाली..शंभर रुपयात जमीन हस्तांतरण महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ नुसार जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ही चालते. एका कुटुंबातील रक्ताच्या नात्यांमध्ये म्हणजेच वडलांकडून मुलाकडे अथवा वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता.
तसेच मित्रांनो, आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्का हा भरावा लागत होता. मात्र आता या रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करत असताना आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाहीआता फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती जमीन हस्तांतरणाची वाटणी पत्र आता करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले होते.
परिपत्रकानूसार, तहसीलदारांना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार वाटणी पत्र करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यामुळे हिंदू कुटुंब पद्धतीनुसार एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यांमध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चितच होणार आहे.महाराष्ट्र शासनातर्फे स्पष्ट आदेश या आधीच काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये जमीनीची वाटणी पत्र करत असताना तसेच गट विभाजन करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ नुसार तहसीलदारांना अधिकार असून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती हे अधिकृत वाटणे पत्र आणि गट विभाजन करून देण्यास कसलीच हरकत नसल्याचे निदर्शनास शासनातर्फे आणून दिले आहे.
आता शासनाच्या नवीन आदेशांवर एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करायचे असेल अथवा गट विभाजन करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ जमिनीचे विभाजन करणाऱ्या वर येणार नाही. वरिल महसुल अधिनियम ८५ नूसार आता फक्त केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन होणार आहे.
No comments: