Gram Panchayat Certificates : नमस्कार या लेखात आपण ग्राम पंचायतच्या सुविधा ऑनलाईन कश्या मिळणार ते जाणून घेणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना काही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देणार आहेत.
आता तुम्हाला ग्राम पंचायतचे सर्व कागदपत्रे घरबसल्या ऑनलाईन मिळणार मिळणार आहे. Gram Panchayatनागरिकांची वेळेची बचत व्हावी आणि शासनाच्या कामात गती यावी या उद्देशाने महा-ई-ग्राम ॲप महाराष्ट्र शासनाने विकसित केले आहे.
नमस्कार मित्रांनो शासन maha e gram citizen connect app या आपच्या मदतीने ग्राम पंचायतीचे सर्व दाखले आपल्या मोबाइल मध्ये उपलब्ध करून देणार आहेया अॅपाच्या माध्यमातून गावकर्यांोना आणि त्याच बरोबर ग्राम पंचयात कर्मचार्यां ना खूप फायदा होणार आहे.नागरिकांना कागदपत्रे मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घाबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी ही ऑप सुरू करण्यात आले आहे.
नागरीकांना मिळणार सुविधा ?
जन्म प्रमाणपत्र
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
मालमत्ते दाखले
असेसमेंट उतारा मिळवण्यासाठी अर्ज
तसेच घरपट्टी, पानी पट्टी कर भराणा करायचा असल्यास आता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही.
वरील प्रकारच्या सुविधा आता नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलमध्येच मिळणार आहे. यामुळे नगरीकांच खूप वेळ वाचणार आहे.सदर ग्रामपंचयातीमध्ये काम करत असलेले पदअधिकारी म्हणजेच सरपंच,उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची माहिती सुद्धा यात असणार आहे.
याव्यतिरिक्त आपले सरकार सुविधा आणि सूचना पेटी असे वेगवेगळे पर्याय सुद्धा यात देण्यात आले आहे.या सर्व पर्यायचा वापर करून आपण आपल्या ग्रामपंचयातीमध्ये विवध सुविधाचा लाभ घेऊ शकता.
या ॲप च्या माध्यमातून नागरिकांना मिळणारा गृहकर, पानी पट्टी व अन्य कर वसूल करणे सोपे होणार आहे. ही वसूल होणारी रक्कन थेट ग्रामपंचयातीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Mahaegram Citizen Connect ॲप प्ले स्टोअर डाउनलोड करुन आपली संपूर्ण माहिती भरून लॉगिन करुन या ॲपच्या मध्यमातून वरिल सुविधाचा लाभ घेता येणार आहे
No comments: