Full Width CSS

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा


 नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड (फाइन) लावला जातो. हि दंडाची प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला लागलेला फाइन तुमच्या नकळत तुमच्या गाडीच्या नंबरला लिंक केला जातो. आणि त्याचा एक मेसेज महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांकडून तुमच्या फोन वर पाठवला जातो.

तो मेसेज पाहून तुम्हाला समजते कि तुमची काहीतरी चूक झालेली आहे. कधी कधी तुमची चूक नसतानाही तुम्हाला फाइन लावला जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची ? आणि जर खरंच चूक झालेली असेल तर हा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण गाडीचा फाइन ऑनलाईन कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.

मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईटला भेट द्याची आहे

वेबसाइट लिंक – mahatrafficechallan.gov.in

तर या वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला E-Challan Payment Maharashtra State स्क्रीनवर दिसेल. या स्क्रीनवर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि चलन नंबर (Challan No.) हे दोन ऑप्शन दिसतील.

तर आपण वेहिकल नंबर हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला गाडीचा नंबर टाकायचा आहे. गाडीचा नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला चेसी नंबरचे (Chassis/Engine no.) शेवटचे चार आकडे इथे टाईप करायचे आहेत.

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 09, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.