Full Width CSS

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi



 आज आपण बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का? असल्या कसा घ्यायचा हे जाणून घेणार आहोत.

तुमचा मनात अनेक प्रश्न असतील जसे.

  • काय असते हे BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB?
  • कसा घ्यायचा BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी प्रवेश?
  • बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का?
  • कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?
  • BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी लोकप्रिय कॉलेजेस कोणती?
  • LLB Full Form in Marathi

    एल एल बी चा फॉर्म आहे – Bachelor of Law.

    LLB ला Legum Baccalaureus पण म्हणतात. 

    BA. LLB

    BA. LLB म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लॉ ( Bachelor of Arts – Bachelor of Law ) हा बारावी नंतर केला जाणारा पाच वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला बी ए ग्रॅज्युएशन सोबत लॉ चे पण विषय असतात.

  • या कोर्स मध्ये तुम्हाला Economics, History, Political Science, Sociology along with law subjects like Civil Law, Criminal Law, Labour Law, Tax Law, Administrative Law, Corporate Law, Patent Law सारखे विषय शिकायला मिळतात.

    BA LLB साठी प्रवेश पात्रता

    BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असावे लागते मंग तुम्ही कोणत्या शाखेतून तुमची बारावी पूर्ण केली असो तुम्हाला BA LLB साठी प्रवेश घेऊ शकता.

    BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी सर्व सामान्य पने सर्वच कॉलेज मध्ये तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. बरेच कॉलेज राष्ट्रीय प्रवेश परीक्षे नुसार प्रवेश देतात तर काही कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते व त्यातील गुनांन नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

    काही लोकप्रिय प्रवेश परीक्षा

    • Common-Law Aptitude Test (CLAT)
    • LSAT India
    • MH CET Law 
    • ILSAT
    • TS LAWCET
    • AP LAWCET

    महाराष्ट्र राज्य मध्ये तुम्हाला BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला MH CET Law हि प्रवेश द्यावी लागते. त्यातील गुणांना नुसार प्रवेश दिला जातो.

  • BCom. LLB

    BCom. LLB हा पाच वर्षाचा कोर्स आहे. या मध्ये तुम्हाला लॉ च्या विषायान बरोबर कॉमर्स शाखेचेही विषय असतात. BA LLB प्रमाणेच Bcom LLB साठी तुम्हाला प्रवेश परीक्षा दयवी लागते.

  • Bsc LLB कोर्स मध्ये BA LLB व BCom LLB प्रमाणे कायद्याच्या विषयांन बरोबर तुम्हाला विज्ञान शाखेच्या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. जसे Chemistry, Electronic Devices, Biotechnology इत्यादि.

    Bsc LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावे लागते. त्याच बरोबर BA LLB व BCom  LLB सारखीच बस्क LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

  • जसे BA LLB मध्ये Law च्या विषयान सोबत BA ग्रॅज्युएशन चे विषय असतात त्याच प्रमाणे Bcom LLB madhe तुम्हाला Law च्या विषयान सोबत कॉमर्स शाखेच्या अभ्यास क्रमातील विषय असतात.

    Bsc LLB

    बॅचलर ऑफ सायन्स अँड बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ (Bachelor of Science and Bachelor of Law) हा एक पाच वर्षाचा कायदा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला बारावी (१०+२) विज्ञान शाखेतून पूर्ण केल्या नंतर करता येतो.Bsc LLB कोर्स मध्ये BA LLB व BCom LLB प्रमाणे कायद्याच्या विषयांन बरोबर तुम्हाला विज्ञान शाखेच्या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. जसे Chemistry, Electronic Devices, Biotechnology इत्यादि.

    Bsc LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावे लागते. त्याच बरोबर BA LLB व BCom  LLB सारखीच बस्क LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

  • नक्की काय असत हे एलएलबी ( LLB ) ?

LLB हा एक पदवीधर कोर्स आहे. तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्या नंतर तुम्ही एलएलबी करू शकता. एलएलबी मध्ये तुम्हाला कायद्या विषयी शिकवले जाते. कायद्यातील केलेल्या तरतुदीन विषयी माहिती मिळते. कायदा चा बारकाईने अभ्यास केला जातो.

एलएलबी (LLB) म्हणजे ( Legum Baccalaureus / Bachelor of Law ) बॅचलर्स ऑफ लॉ . भारता मध्ये Bar Council of India (BCI) ही सर्व युनिव्हर्सिटी व विद्यालयन मध्ये शिकवल्या जाणाऱ्या पदवी चे व अभ्यासक्रम चे नियोजन व व्यवस्थापन करते. BCI च्या निरीक्षणा खाली LLB ही पदवी दिली जाते.

भारतातील सर्वात लोकप्रिय कायद्याच्या महाविद्यालयांमध्ये हा कोर्स शिकवला जातो. एलएलबी कोर्सचा भाग म्हणून, उमेदवारांना नियमित क्लासेस, म्युट कोर्ट, इंटर्नशिप तसेच ट्यूटोरियल काम करणे आवश्यक असते.

एलएलबी उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही वकील म्हणून काम करू शकता त्यासाठी तुम्हाला All India Bar Exam (AIBE) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. BCI ही परीक्षा घेते .
AIBE ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ‘ Certificat of Practice’ दिले जाते. वकील म्हणून काम करण्यासाठी हे Certificate अनिवार्य आहे.

कसा घ्यायचा एलएलबी साठी प्रवेश ?

LLB साठी प्रवेश घेण्या साठी तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असावे लागते. मग ते कोणत्याही शाखेतून असो तुम्हाला LLB साठी प्रवेश घेता येतो. तुम्हीं BA LLB व LLB मध्ये गोंधळून जाऊ नका LLB हा तीन वर्षाचा कोर्स आहे जो ग्रॅज्युएशन नंतर करता येतो.

तर BA LLB हा पाच वर्षांचा कोर्स आहे यामध्ये तुम्हाला BA + LLB शिकवले जाते आणि हा कोर्स तुम्हीं बारावी उत्तीर्ण झालेल्या नंतर करू शकता.

कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागत ?

काही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जात नाही. पण सामान्य पने बराचाश्या कॉलेज मध्ये राष्ट्रीय प्रवेश परीक्षा तील गूनान नुसार प्रवेश दिला जातो. काही कॉलेजेस मध्ये त्यांच्या कॉलेजेस च्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

प्रवेश परीक्षा मधील गुणांन नुसार प्रवेश दिला जातो. काही कॉलेजेस मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये देखील विशिष्ट गुणांची मागणी असते.

लोकप्रिय प्रवेश परीक्षा

  • DU LLB Entrance Exam
  • Allahabad University LAT Exam
  • Maharashtra Common Entrance Test for Law Panjab University LLB Entrance Exam
  • Telangana State Law Common Entrance Test Law School Admission Test India
  • Andhra Pradesh Law Common Entrance Test BHU Undergraduate Entrance Test

LLB आणि BA. LLB मध्ये काय फरक असतो ?

LLB हा तीन वर्षाचा कोर्स आहे जो गर्ज्युएशन नंतर करता येतो तर BA LLB हा पाच वर्षांचा कोर्स आहे जो बारावी नंतर करता येतो.

एलएलबी साठी लागणारी स्किलस (Skils)

कायद्याच्या प्रवाहाचा भाग म्हणून एलएलबी हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. करिअरची निवड म्हणून कायदा करणे ही अत्यंत मागणीची आहे आणि इच्छुकांनी त्यांच्या विषयासह परिपूर्ण असणे आवश्यक आहे आणि बरेच तास काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या क्षेत्रात सामील होऊ इच्छिणार्या उमेदवारांना खाली नमूद केलेले कौशल्य संच असणे आवश्यक आहे.

  • ओघ आणि बोलण्याची स्पष्टता
  • आत्मविश्वास
  • वस्तुस्थिती
  • संशोधनात रस
  • बुद्धी
  • अखंडता
  • दृढ शक्ती
  • तथ्ये आत्मसात करण्याची तसेच विश्लेषित करण्याची क्षमता
  • एखाद्या विषयावर वाद घालण्याची क्षमता
  • तपशील रस
  • मन वळवणे
  • परिस्थिती / लोकांचा चांगला निर्णय
  • मानसिक आणि शारीरिक तग धरण्याची क्षमता
  • चांगले सादरीकरण कौशल्य

एलएलबी मधील विषय आणि अभ्यासक्रम

एलएलबी कोर्सचा भाग म्हणून शिकवलेला अभ्यासक्रम कॉलेज ते कॉलेजात बदलू शकतो. एलएलबी कोर्समध्ये शिकवले जाणारे काही सामान्य विषय खाली दिले आहेत.

  • कामगार कायदा
  • कौटुंबिक कायदा
  • गुन्हेगारी कायदा
  • व्यावसायिक नैतिकता
  • बंदर आणि ग्राहक संरक्षण कायदा कायदा
  • घटनात्मक कायदा
  • पुरावा कायदा
  • लवाद, सलोखा आणि वैकल्पिक
  • मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदा
  • पर्यावरणीय कायदा
  • मालमत्ता कायदा
  • न्यायशास्त्र
  • कायदेशीर सहाय्य
  • कराराचा कायदा
  • नागरी प्रक्रिया संहिता
  • कायद्याचे स्पष्टीकरण
  • कायदेशीर लेखन
  • प्रशासकीय कायदा
  • फौजदारी प्रक्रियेची संहिता
  • कंपनी कायदा
  • जमीन कायदे (कमाल मर्यादा आणि इतर स्थानिक कायद्यांसह)
  • गुंतवणूकी आणि सिक्युरिटीज कायदा / कर आकारणीचा कायदा / सहकारी कायदा / परराष्ट्र कायदा
  • पर्यायी कागदपत्रे – करार / विश्वस्त / महिला व कायदा / गुन्हेगारी / आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कायदा
  • तुलनात्मक कायदा / विमा कायदा / कायद्यांचा संघर्ष / बौद्धिक मालमत्ता कायदा

एलएलबी नंतर नोकर्‍या आणि करिअरच्या संधी

एलएलबी पदवी मिळविल्यानंतर उमेदवार नोकरी करू शकतील अशी काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल खाली दिल्या आहेतः

वकील

या जॉब प्रोफाइलमध्ये, एखाद्याला सिव्हिल तसेच फौजदारी खटल्यांमध्ये ग्राहकांना सल्ला आणि प्रतिनिधीत्व करणे आवश्यक असते. वकील न्यायालयात खटले सादर करतात आणि सर्व कार्यवाही आणि सुनावणीत भाग घेतात.

कायदेशीर सल्लागार

अशा जॉब प्रोफाइलमध्ये काम करणे निवडणारे उमेदवार असे वकील देखील आहेत जे कायद्याच्या विशिष्ट क्षेत्रात खास माहिर आहेत. कायदेशीर सल्लागार सहसा सरकार तसेच मोठ्या संस्था / कंपन्या घेत असतात. कायदेशीर सल्लागाराचे मुख्य कार्य म्हणजे त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही कायदेशीर अंमलबजावणीपासून किंवा परिणामी त्याचे रक्षण करणे.

अधिवक्ता

अशा जॉब प्रोफाइलमध्ये एखाद्याने आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तथ्यात्मक डेटा तसेच शारीरिक पुरावे गोळा करण्यासाठी बरेच संशोधन कार्य करण्याची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त वकिलांना वाटप केलेल्या इतर जबाबदार्यांमध्ये करारांची छाननी व मसुदा तयार करणे समाविष्ट आहे.

सॉलिसिटर

अशा जॉब प्रोफाइलमध्ये एखादी व्यक्ती सामान्यत: कर, खटला भरणे, कुटुंब किंवा मालमत्ता कायद्याच्या विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञ असते. सॉलिसिटर खासगी तसेच व्यावसायिक ग्राहकांना कायदेशीर सल्ला देतात.

शिक्षक किंवा व्याख्याता

 एलएलबी पदवी पूर्ण झाल्यानंतर उमेदवार महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्तरावर कायदा शिकवू शकतात.


अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 28, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.