ऑरेंज परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूर येथील युवा शेतकरी गोपाल देवळे यांच्याकडे आठ एकर क्षेत्रावर संत्राबाग (Orange Crop) आहे. या वर्षी या बागेतून 35 लाख रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. महाराष्ट्रात संत्रा उत्पादक जिल्हा म्हणून आधी नागपूरची (Nagpur) ओळख असायची, परंतु वाशीम जिल्हाही संत्रा उत्पादनासाठी मागे नाही हे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांनी सिंचनासाठी अनेक पर्याय निर्माण करून शेतीत नियमित पिकाबरोबरच भाजीपाला व फळ पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. या परिसराला आता ऑरेंज परिसर म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना फळबागांची खरी ओढ लावली आहे.
Nagpur Orange Season
भूर येथील युवा शेतकरी गोपाल देवळे यांनी त्यांच्या आठ एकर क्षेत्रामध्ये संत्र्याची लागवड केली आहे. संत्र्याचा या वर्षी दुसरा तोडा घेण्यात आला. यामध्ये जवळपास 5 हजार कॅरेट संत्र्याचे उत्पादन निघाले. या वेळी संत्र्याला 700 रुपये प्रति कॅरेट असा दर मिळाला. त्यातून जवळपास 35 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
No comments: