Full Width CSS

Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये



 महाराष्ट्र राज्यामधील जे मागासवर्गीय (SC) समाजातील विद्यार्थी आणि नवबौद्ध प्रवर्ग (NP) समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना 2022 सुरू करण्यात आली आहे.

या योजनेमध्ये Swadhar Yojana दहावी, बारावी, डिप्लोमा, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तसेच इतर प्रोफेशनल कोर्स चे शिक्षण घेण्यासाठी आणि त्यासोबत राहण्यासाठी वसतीगृहे, बोर्डिंग आणि इतर दुसऱ्या आवश्यक खर्चासाठी महाराष्ट्र सरकार दर वर्षी विद्यार्थ्याला 50,000 हजार रुपये दिले जाते. महाराष्ट्र समाज कल्याण विभाग (Maharashtra Social Welfare Department) अंतर्गत ही महाराष्ट्र स्वाधार योजना 2022 चालवण्यात येत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 

स्वाधार योजनेमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेतात तेव्हा त्यांना या योजनेचे पैसे दिले जाते. यामध्ये जे विद्यार्थी व्यावसायिक आणि गैर व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे सर्व मागासवर्गीय (SC) समाजातील आणि नवबौद्ध प्रवर्ग (NP) समाजातील सर्व पात्र विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आणि त्या सोबत जे विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश पात्र असून प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्याला सुद्धा या swadhar yojna चा लाभ घेता येईल.

या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांना राहणे, खाणे आणि दुसरे इतर खर्चासाठी पैसे दिले जात आहे.

स्वाधार योजना चा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल

 

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याला 60% गुणापेक्षा कमी गुण असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

विद्यार्थी जर नवबौद्ध प्रवर्ग समाजातील अपंग असेल तर त्या विद्यार्थ्याला कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनाची पात्रता

 

Swadhar yojan स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  1.   स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक आहे.
  2. ज्या विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल असे विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  3. 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याने ज्या शाखेमध्ये प्रवेश घेतला असेल त्या शाखेचा कालावधी हा 2 वर्षाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.
  4. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे बँकेत खाते असावे. आणि त्या बँक खात्याला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  5. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.