पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का? काय आहेत नियम जाणून घ्या
नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM Kisan Yojna Eligibility सरकार द्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. तशीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM Kisan Yojna राबविली. या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतात.
हे रुपये सरकार 4 महिन्याच्या अंतराने 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात. आता पर्यंत शेतकऱ्यांना 12 हफ्ते देण्यात आले आहेत.
या योजनेमध्ये दर वर्षी अनेक बदल करण्यात येतात. जर पती आणि पत्नी हे दोघे शेतकरी असेल तर त्या दोघांना या योजनेचा लाभ मिळेल अशी चर्चा सुरू आहे.
पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळेल का?
PM kisan Yojna ही शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. जर पती आणि पत्नी हे दोघेही शेतकरी असतील तरीही कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अशी माहिती पी एम किसान योजनेचे कार्यालयीन वेबसाईट वर ही माहिती दिलेली आहे.
PM Kisan Yojna Eligibility
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणताही एक नागरिक या साठी नोंदणी करू शकतो. जर एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्तींनी यावर नोंदणी केली असेल, तर त्या व्यक्तींची नोंदणी ही रद्द करण्यात येईल. जर एका कुटुंबातील दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तींकडून त्यांना दिलेली रक्कम ही कधीही सरकार वसूल करू शकते.
काय आहेत पी एम किसान योजनेचे नियम
- पी एम किसान योजनेच्या नियमांनुसार जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीचा वापर शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर दुसऱ्या कामासाठी केला किंवा एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या शेतात भाड्याने शेती केल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- एखादा शेतकरी असेल ज्याची स्वतःची जमीन असेल पण ती त्याच्या नावावर नसून वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर त्याला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
No comments: