तुमच्या पायातील रक्तवाहिन्या 🩸 या अगदी बारीक तंतूप्रमाणे आणि अगदी वाकड्या तिकड्या दिसत असतील तर हे लक्षण वेळीच ओळखायला हवे. पायातील नसा सुजल्याने अनेकांना प्रचंड वेदना 😖 जाणवतात, तर काहींना अगदी नेहमीची कामे सुद्धा करणे अशक्य होऊन बसते. वैद्यकीय भाषेत या लक्षणांना व्हेरिकोज व्हेन्स असे म्हंटले जाते, यामध्ये नसांच्या आजूबाजूच्या त्वचेचा 🫳🏻रंग बदलणे, बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्याने तीव्र वेदना होणे असेही त्रास जाणवतात.
व्हेरिकोज व्हेन्स वरील उपचारासाठी आपल्याला गोळ्या औषधांचा 💊 मारा करण्याची गरज नाही. उलट काही सोप्या आयुर्वेदिक उपचारांनीही आपण आराम 👍🏻 मिळवू शकता. रक्तवाहिन्या शुद्ध राहाव्यात व व्हेरिकोज मुळे होणारी जळजळ किंवा वेदना कमी होण्यासाठी खालील उपाय आपणही करून पाहू शकता..
▪️जास्त वेळ उभे 🪑 किंवा बसू नका. ब्रेक घ्या. आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहणे आणि चालणे 🚶🏻♂️ उपयुक्त ठरू शकते.
▪️तुम्ही बसलेले असताना पाय वर करा. आपण डोक्याखाली उशी घेण्याऐवजी पायाखाली ठेवू शकता किंवा भिंतीला लागून बेड असल्यास भिंतीच्या आधारे पाय टेकवून ठेवू शकता. यामुळे रक्तवाहिन्यांना रक्ताभिसरणात मदत होईल.
▪️अँटी- इन्फ्लेमेंटरी तेलाने पायाला मसाज करावा, यासाठी मध्यम दाब ठेवा व खालून वर अशा दिशेत मालिश करा.
▪️योगासन: विशेषत: शीर्षासन, मेरुदांडासन, पदौत्तानासन, सर्वांगासन, नौकासन अशी आसने करणे फायदेशीर आहे. यामुळे पायात रक्त साचून राहिले असल्यास ते वाहते होण्यास मदत होते.
▪️नियमित व्यायाम करा पण अतिरेक करू नका.
अशुद्ध रक्तामुळे त्रास उद्भवत असल्यास केवळ व्यायाम नव्हे तर आहारात 🥗 सुधार करणेही गरजेचे आहे. आपल्याला घरगुती उपायांनी आराम मिळत नसल्यास आयुर्वेदिक उपचार घेण्याचा विचार करू शकता. मात्र त्रास वाढेपर्यंत किंवा रक्तस्त्राव🩸 होईपर्यंत थांबू नका, वेळेवर उपचार न केल्यास यावर शस्त्रक्रियेशिवाय उपाय उरत नाही त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
No comments: