Full Width CSS

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचा इतिहास


 

८ मार्च या दिवसाचं महत्त्व काय? तर हा दिवस संपूर्ण जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतातही या महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम साजरा करण्यात येतात महिलांचे सत्कार, विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांना पुरस्कारही दिले जातात.

पण आपण महिला दिन साजरा करतो त्यामागचे नेकमे कारण काय हे अजूनही आपल्या पैकी अनेकांना माहिती नाही. चला जाणून घेऊया याच महिला दिनामागचा माहित नसलेला इतिहास!

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता.

पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

१८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितां विषयी पूर्वग्रह असणारी होती.

दक्षिणेकडील देशांना कृष्णवर्णीय ,मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती

या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

या परिषदेत क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने

सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.

अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या.

दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

या ठरावानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या.

त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. त्यानंतर पुढे जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा​ होऊ लागला.

ती आई आहे, ती ताई आहे
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे
ती पत्नी आहे, ती सून आहे
ती सासू आहे, ती आजी आहे
पण याआधी ती एक स्त्री आहे,
जिचा आम्हांला अभिमान आहे ….

!! संपूर्ण स्त्री शक्तीला विशाल मल्टी सर्विसेस तर्फे मानाचा मुजरा !! 

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचा इतिहास जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचा इतिहास Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.