गुढीपाडवा (Gudi Padwa) आपल्या संस्कृतीतील महत्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो.हा फक्त सुरवातीचा सणच नाही तर, या दिवशी वर्षाची सुरुवात वसंत ऋतूचे आगमन आणि त्याच बरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो. आणि तसेच चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो, आणि म्हणूनच,मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याच नाव हे “चैत्र” हे आहे.तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय.
Gudi Padwa In Marathi गुढीपाडवा माहिती मराठी
नुकतीच थंडी संपून ,उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते.होळीच्या सणाला सर्व अमंगल, अशुभ ,पापी गोष्टींचे दहन करून ,तसेच या वर्षी तर कोरोनासारख्या भिषण रोगाचे देखील होळीच्या अग्नीत दहन केलं. आणि निर्मळ पाण्यात धुहून ,रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगा उन ,असे जणू सगळ्यांना सांगत असते.रंगात रंगून घ्या आनंदात भिजून पण घ्या,कारण आता आपले नविन वर्ष येत आहे. जनु नवीन वर्षाच्या स्वागताला, सृष्टीच साक्ष देते आणि सप्त रंग उधळत रंगपंचमी, आपल्या गुढीपाडव्याच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते……. आणि सांगते ” जय्यत तयारी करा,मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे ,त्याच्या पाऊल खुणा उठवण्यासाठी त्यानेच सुवर्ण किरणच्या पायघड्या अंथरल्या आहेत”. निसर्ग बोलत असतो,आता “जुने टाकून ,नवे हिरवे शालू नेसून घ्या” पिवळी पाने गळत असतात,हिरवळ फुटत असते.अंबा मोहरत असतो.आणि म्हणूनच की काय वृक्ष वेली,”नागराज ने डोयी जड झालेली कातन टाकून ,पुन्हा स्वतःला जसे पुनर्जनमच भेटतो तसे पुनर्जीवित होतात,”
साडे तीन महूर्थापैकी एक पूर्ण महुर्थ मानला जाणाऱ्या पाडव्याच खरच काय कारण असेल, हा प्रश्न नहमी मला लहान पणी पडला.पण त्याच पटेल असे उत्तर कधी नाही भेटल.पण जेव्हा निसर्गातील बदल आणि सृष्टीची हालचाल काहीतर वेगळा सांगावा सांगू लागली तेव्हा समजल,की पारंपरिक दृष्टीने म्हणजे ,आपला गुढी पाडवा आपल्या मराठी संस्कृतीचा नवीन वर्षाची नवी सुरवात आहे,तसेच गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच कळक हा जसा उंच असतो.तसेच या घरातील प्रत्येक व्यक्ती अशीच उतुंग भरारी घेऊ,आरोग्य लाभो,सुखात आनंदात राहो! त्यांच्या पंखात एवढं बळ असो की ,आकाशात गवसणी घालू त असे आमचे आई बाबा सांगतात.त्याचबरोबर बोलतात….या बांबूला तांबडा कलश ,नववारी साडी,आंब्याची डहाळी,साखरेची घाटी,कडू लिंबाची धाहळी,चाफ्याची फुलाची माळ एकत्र करून रेशमी धाग्यात बांधून ते कळकाला बांधली जाते.
घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते.हा सण आनंद ,मांगल्य,यांचे प्रतीक असतो,एकुणात या सगळ्याला गुढी म्हणतात.याच दिवशी घरातील सर्व स्त्रिया काटपद्राची साडी नेसतात .कपाळावर चंद्र बिंदी असते.नाकात नथ घालतात.तसेच घरातील पुरुष देखील मस्त तयार होतात.मग ते गुढी ची पूजा करून औक्षण करतात.आणि गुढी उभारतात.
या दिवशी आणखी कडू गोड आठवण म्हणजे,पाढव्याच्या महुर्थावर सगळ्यांना लिंब दिला जातो,हा लिंब म्हणजे काय तर,लिंबाचा पाला,चिंच गूळ,खोबरे,हरबऱ्याची डाळ घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते.आणि ती खायचीच असते.जी लहान पनी मला खायला सांगितली तर” मला माझ्यावर अन्याय होतोय असे वाटायचं”.पण यातील खासियत ही होती त्यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदाच गुणांनी बनलेला असतो.
जसे की चिंच रक्त शुद्ध करण्यासाठी ,कडू लिंब उष्णता कमी करण्यासाठी असतो,खोबरे शरीरात थंड पण वाढवते .त्याच बरोबर पाढव्या परेंत शेतकऱ्याच्या वर्षाची राशी म्हणजेच ज्वारी,गहू गाळून घरी आणलेलं असते.आणि कणघ्यात भरले जाते.आणि म्हणून या धान्याच्या कणघ्यावर गाईच्या शेणाने पाडवा म्हणून काही चिन्ह काडली जातात.त्याला पाडवे म्हणतात.आणि ती चिन्ह घराच्या चौकटीवर आणि धान्याच्या कनगिवर काडलीच जातात.आणि त्या चीन्हांना डाळ आणि कडू लिंबनी नटवली जातात.आणि चिन्हांना पाडवा म्हणतात,तसेच बांबूची काटी उभारून जी गुढी बनते त्याला गुढी म्हणतात.आणि या दोन्ही बनून गुढीपाडवा होतो.अशी वैज्ञानिक ,धार्मिक,आणि सांस्कृतिक कारणांनी योग्य रित्या गुढी पाडवा सण बनलेला आहे.
धार्मिक ते नुसार बोलायचं झालं तर,याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी,रावणाचा वध केला ,आणि धर्माचा विजय करून अयोध्येला आले,आणि हा दिवस म्हणजे चैत्र महिन्याच पहिला दिवस होता,म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो,आणि याच दिवशी शिव पार्वतीचा विवाह निच्छित झाला,आणि तृतीयेला संपन झाला, त्याचबरोबर कुंभाराचा मुलगा शालिवाहन यांनी मातीचे सैन्य करून त्यांच्यावर चैतन्याचा मंत्र टाकून मृदुमकी गाजवली आणि हुमनासारख्या शत्रूचा पराजय केला.अशी अतुलनीय पराक्रम आणि सोहळे याच दिवशी झाले म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो.आणि आपल्या संस्कृतीचा महत्वाचा सण म्हणून साजरा होऊ लागला.
साडे तीन महूर्था पैकी,गुढी पाडव्याच हा एक महूर्त मानला जातो ,आणि याच दिवशी आपले भारतीय पंचांग बनवले जाते,त्याची पूजा करूनच त्याच्यातील नक्षत्र आणि ग्रह यांचा अभ्यास केला जातो.या दिवशी नियोजित सर्व कार्य आणि नवे उद्योग,व्यवसाय, सुरू करतात तसेच ,वास्तू प्रवेश,व्यवहार,महत्वाची खरेदी आणि सोन्याचे खरेदी सारखे देखील व्यवहार केले जातात.
गुढी ला उभारल्या नंतर घरातील सर्व मंडळी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून जेवण करतात.आणि नंतर सुरू होते ते म्हणजे,वाऱ्यामुळे कोणत्या गुढीची घाटी पडती याची वाट बगत मान मोडेपरेंचा प्रवास,म्हणजे काय तर घरातील वडीलधारी म्हणतात.ज्याला पडलेली घाटी सापडेल तो बिना अभ्यास करता पास होतो.एक बालिश आठवण आहे.
गुढी उतरायचं मुहूर्त पाहून त्या वेळी गुढीला श्रीफळ फोडले जात आणि त्याच बरोबर घाटी च बतासा प्रसाद म्हणून आणि आरोग्याचं प्रतीक वाटला जातो.असे आम्ही प्रत्येक घरी फिरायचो.आणि ज्याचे बताशे ज्यास्त असतील,त्याला तो आम्हाला ज्यादाचे देत नाही तोपर्यंत आम्ही त्याला “गुढी पाडवा ,नीट बोल गाढवा”असे बोलायचो,अश्या प्रकारे गुढी साजरी होईची.अशा गोड आणि विनोदी आठवणींनी भरलेला आणि संस्कृतीचा वारसा घेऊन चालणारी गुढी पाडवा हा उत्सहाचा , संकल्पना चा सण आहे.
विशाल मल्टी सर्विसेस तर्फे सर्वांना गुढी पाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा…..!
No comments: