Holi Information in Marathi
Holi Information in Marathi: होळी वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा! | Holi Wishes in Marathi
होळी हा सण का साजरा केला जातो? | Why we celebrate holi in Marathi?
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळी चा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूकभूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते.
होळी च्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
कशी साजरी केली जाते होळी | How to Celebrate Holi in Marathi
होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्र ला होळी च्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खासकरून वज्र या जातात. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते, आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात.
मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंग पंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात ” बुरा ना मानो होली है !”
उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळी ची एक वेगळीच शान आहे. होळी च्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून , ह्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्या सोबत हि होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात. अश्या ह्या होळी ची तयारी लोक १५ दिवस अगोदर पासूनच करतात.
काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळी चा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूकभूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते.
होळी च्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
होळी ला घ्यायची काही काळजी | How To Take Care of Yourself on Holi in Marathi
१) होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
२) तसेच आजकाल भांग मध्ये देखील बरेच अन्य नाशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अश्या पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.
३) चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये.
४) घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अश्या सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते.
५) सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.
!!विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र तर्फे आपण सर्वांना होळी व धुली वंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: