Full Width CSS

Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त

 


What is meaning of Vasu Baras: हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिचा सेवा केली जाते. असं म्हणतात की, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा २८ ऑक्टोबर रोजी (आज) वसुबारस साजरा केला जाईल.

वसुबारस शब्दाचा अर्थ काय?

हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस. त्यामुळे या दिवसाला वसुबारस, असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्येही साजरा केला जातो. या दिवशी घरातील विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी गाईची पूजा करतात. तिला नैवेद्य खाऊ घालतात. परंतु, हल्ली शहरात गाईच्या मूर्तीची पूजा केली जाते.Vasu Baras 2024 : हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2024) हा सर्वात मोठा सण मानला जातो. यामध्येच दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने (Vasu Baras) केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. 

वसुबारसचं महत्त्व काय?

गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन केलं जातं. गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसेच, चारा खायला दिला जातो. . तिला गंध लावून गाईची पूजा केली जाते. तसेच, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे  या हेतूनेही गाईची पूजा करण्याचं महत्त्व आहे. 

Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on October 29, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.