Full Width CSS

धनत्रयोदशी

 


आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

धनत्रयोदशी या सणामागे काही दंत कथा ही आहे. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
भारतात काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी लोक सोने-चांदीची भांडी, नाणी, आभूषण इ. खरेदी करतात

धनत्रयोदशी कथा

धनत्रयोदशीच्या मागे आणखी एक कथा आहे. भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्यूमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्या वेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमारच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले.म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करुन अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धन्वंतरीची पूजा करण्याचे महत्त्व

दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळविण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता, म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे
धनत्रयोदशी धनत्रयोदशी Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on October 29, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.